Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

खेमेवाडी प्राथमिक शाळा शिक्षकाची बदली करा : ग्रामस्थांचे बीईओना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक अजय काळे हे विद्यार्थी व एसडीएमसी तसेच पालकांशी उर्मट वागतात, विद्यार्थ्यांना मारबडव करतात. त्यामुळे पहिलीच्या वर्गात विद्यार्थी जाण्यास घाबरतात. त्यामुळे पहिलीचा वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशा शिक्षकाची उचल बांगडी करावी, अशा मागणीचे निवेदन खेमेवाडी शाळेच्या एसडीएमसीच्या …

Read More »

खानापूरात भाजपतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पंधरावडा कार्यक्रमात शनिवारी खानापूर येथील श्री साई हॉस्पीटलमध्ये मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद …

Read More »

गणेबैल मराठी शाळेच्या चैतन्य मजगावकरची राज्यपातळीवर निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : गणेबैल (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचा इयत्ता सातव्या विद्यार्थी चैतन्य पुंडलिक माजगावकर याने नुकताच झालेल्या जिल्हा पातळीवरील उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल चैतन्य मजगावकरचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे. त्याला मुख्याध्यापक एस. टी. पाटील व इतर शिक्षकांचे …

Read More »

एचव्हीके मराठी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रकारांमध्ये यश

  निपाणी : येथील मराठा मंडळ संचालित श्रीमती एचव्हीके मराठी विद्यानिकेतन शाळेने चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या विविध पातळीवरील स्पर्धेमध्ये शाळेमधून भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले. वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी 100 मीटर धावणे तेजस माळी आणि प्राची हजारे, लांब उडी हार्दिक …

Read More »

कोगनोळी आरटीओ कार्यालयावर शुकशुकाट

लोकायुक्तची कारवाई : परवाना देण्याचे काम सुरू कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ कार्यालयावर लोकायुक्त यांनी शुक्रवार तारीख 30 रोजी पहाटे धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. या कार्यालयाविषयी वाहनधारकांच्यात तीव्र नाराजी पसरली होती. महाराष्ट्र, गुजरात, …

Read More »

निधर्मी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

  प्रसन्नकुमार गुजर : जनता दल पक्ष कार्यालयाचे उद्घाटन निपाणी : कर्नाटक राज्यात निधर्मी जनता दलाची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी समाजाला दिशा देणाऱ्या योजना राबविल्या. त्यांच्या दूरदृष्टी योजनामुळे राज्यातील विकास अद्यापही गतिमान असून अनेक योजना विकासाच्या दृष्टीने कायम राखले आहेत. राज्याला कुमारस्वामी सारखे नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे कुमारस्वामी …

Read More »

रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांचा मांगुर येथे सत्कार

  निपाणी : समाजाला दिशा देण्यासाठी दिवंगतशिवाजी बिरनाळे फाउंडेशनसारख्या सामाजिक माध्यमांची गरज आहे. आज समाजामध्ये हजारो लोक मदतीसाठी आतुरलेले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे ही गरज आहे. त्यामुळे सामाजिक सेवा करणाऱ्या सर्वच लोकांनी याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. समाजसेवा ही ईश्वराची सेवा आहे, असे मत शुभरत्न केंद्रचे सर्वेसर्वा रत्नशास्त्री ए. एच. …

Read More »

अमलझरी येथे इंडियन ग्रुपच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

  निपाणी : निपाणी जवळच असणाऱ्या अमलझरी गावात नवरात्रोत्सवानिमित इंडियन ग्रुपच्या वतीने सौभाग्यवतीचा सन्मान असणारा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता, प्रथमतः दुर्गा माता मूर्तीची विधिवत पुजा करून ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. सुनिल सदाशिव खोत, सुविध्य पत्नी व परिवार यांचेकडून देवीची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या भक्तांना खजूर, केळी प्रसाद …

Read More »

कारलगा गावचा ग्राम निर्मल योजनेअंतर्गत आराखडा तयार

  खानापूर : आज शुक्रवार दि.30/9/22 रोजी कारलगा गावामध्ये हेब्बाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम निर्मल योजनेअंतर्गत गावचा आराखडा (नकाशा) काढून त्याद्वारे समस्यांचा आढावा घेण्यात आला. मांडलेल्या समस्या पुढील प्रमाणे, पिण्याच्या पाण्याची समस्या सीसी गटर, सीसी रोड, विजेची समस्या, गावामध्ये सरकारी दवाखाना, गुरांचा दवाखाना, मलप्रभा नदीपासून गावापर्यंत पाण्याची व्यवस्था, तसेच गावच्या तळ्याचे …

Read More »

खानापूर मराठा मंडळ हायस्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

खानापूर (प्रतिनिधी) : मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील मराठा मंडळ सेकंडरी स्कूलच्या एकूण सात खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. त्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे : ओम अनिल कुंभार याने १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. नमन सतिश …

Read More »