हुबळी : हुबळी येथील एका ५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी रक्षित कांती ठार झाला. याप्रकरणी पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केल्याने त्याच्या छातीत गोळी लागल्याने …
Read More »गुंजी ग्राम पंचायतीची आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडे मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील गुंजी गावच्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्यासंदर्भात ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची भेट घेत मागणी केली आहे. गुंजी ग्रामपंचायत आध्यक्षा सौ. स्वाती गुरव व ग्रामपंचायत सदस्यांनी हट्टीहोळी यांची खानापूर तालुक्यातील त्यांच्या गावी चिक्क हट्टीहोळी येथे भेट घेतली. सदर निवेदनाद्वारे गावातील …
Read More »हुबळीत पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या
स्थानिकांची आरोपींना एन्काउंटर करण्याची मागणी बंगळूर : राज्यात मुलींवरील क्रूर कृत्ये थांबण्याचे नाव घेत नाहीत. हुबळीमध्ये अशीच एक भयानक घटना घडली आहे, ज्यामुळे नागरी समाजाला लाज वाटावी. हुबळी येथील अध्यापक नगरमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक आणि पालकांनी मुलीवर अत्याचार करून …
Read More »गळतगा येथील नेत्र तपासणी शिबिरात १०६ नेत्र रुग्णांची मोफत तपासणी
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेची गळतगा शाखा आणि सांगली येथील कुल्लोळी नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गळतगा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये गळतग्यासह परिसरातील १०६ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. रमेश पाटील यांनी स्वागत केले. …
Read More »श्री संत एकनाथ भारुड भजनी मंडळाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
खानापूर : कारलगा पंचक्रोशीतील श्री संत एकनाथ भारुड भजनी मंडळ हे गेले सहा दशकावून अधिक काळ भारुडाच्या माध्यमातून मराठी भाषा कला व संस्कृतीचे जतन करीत आहे. 1972 साली स्थापन झालेल्या या मंडळाचे कार्य आजतागायत निरंतर चालू आहे. खानापूर तालुक्यात खेडोपाडी भजनी भारुडाचे सादरीकरण करत समाज प्रबोधनाचे काम या भजनी …
Read More »निपाणीतील डॉ.आंबेडकर विचार मंचतर्फे निरंतर पुस्तक वाचनाने महापुरुषांना अभिवादन
निपाणी (वार्ता) : सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक महापुरुषांनी समाज व्यवस्था बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. त्यामुळे समाजाला वैचारिक वारसा देण्याचा प्रयत्न झाला. शिवाय प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्याची क्षमता महापुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये होती. ही कार्यक्षमता केवळ महापुरुषांनी वाचन क्षमतेच्या जोरावरती केली. त्यामुळे येथील डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे शुक्रवारी (ता. ११) येथील …
Read More »४० टक्के कमिशन आरोप; चौकशीसाठी एसआयटी स्थापन्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
बंगळूर : राज्यातील मागील भाजप सरकारवर ४० टक्के कमिशन घेतल्याचा आरोप होता. या आरोपावर न्यायमूर्ती नागमोहन दास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे अधिक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आज विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना कायदा …
Read More »मंत्रिमंडळ बैठकीत वादग्रस्त जात जनगणना अहवाल सादर
१७ च्या विशेष बैठकीत अंतिम निर्णय; अभ्यासासाठी सर्व मंत्र्यांना देणार अहवालाची प्रत बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी वादग्रस्त सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण, ज्याला जात जनगणना म्हणून ओळखले जाते, ते आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आले. त्यावर आता १७ एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम चर्चा केली जाईल. कर्नाटक …
Read More »कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : म्हादई नदी वळणाच्या प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे. तसेच म्हादई -मलप्रभा पाणलोट क्षेत्रात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन प्रदेशातील लोकांच्या उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. या खेरीज अन्य इतर गंभीर कारणास्तव कळसा -भांडुरा प्रकल्प सरकारने …
Read More »बोलेरो आणि परिवहन बस यांच्यात भीषण अपघात: एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
यादगिरी : यादगिरी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मद्दरकी जवळ राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री बोलेरो आणि परिवहन बस यांच्यात भीषण अपघात झाला असून यात चार जण जागीच ठार झाले आहेत. शरणप्पा (30), सुनिता (19), सोमव्वा (50) आणि थंगम्मा (55) अशी मृतांची नावे आहेत, ते सर्व वर्कनहळ्ळी गावातील रहिवासी आहेत. इतर अनेक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta