निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. शिवाय सध्या पुरवठा होणाऱ्या पाण्यामधून गाळ येत आहे. अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत शिरगुप्पी ओढ्यातून दरवर्षी येणाऱ्या पाण्याच्या मार्गावर टाकाऊ वस्तु आणि झाडे झुडपे उगवली आहेत. पाऊस …
Read More »कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज; डी. के. शिवकुमार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
बंगळुरू : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना वेग आला असून कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज (शनिवार) सायंकाळी ४ वाजता विधानसौध येथे होणार आहे. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून औपचारिक निवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यपाल गेहलोत यांनी …
Read More »अर्धवट कामामुळे मानकापूरमध्ये अपघातांच्या संख्येत वाढ; ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील इचलकरंजी- हुपरी मार्गावरील माणकापूर बसस्थानक समोरच्या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाच्या प्रमाणात वाढ होत आहे. सदर बसस्थानक समोरच्या रस्त्यालगतच गेल्या दोन- अडीच महिन्यापासून गावातील गटारीच्या सांडपाणी निवारणासाठी चर खुदाई करून निघालेल्या मातीचे ढिगारे रस्त्यावरच टाकलेले आहेत. त्यामुळे सदर रस्ता अरुंद बनला असून या ठिकाणी वरचेवर वाहनांची …
Read More »निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी
निपाणी (वार्ता) : आगामी निपाणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असे आवाहन फोर- जे- आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित बैठकीत करण्यात आले आहे. बैठकीतील माहिती अशी, निपाणी नगरपालिकेच्या इतिहासात आजपर्यंत निवडणुका शांततापूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आहेत. येणाऱ्या …
Read More »संवाद कौशल्य, आधुनिक तांत्रिक शिक्षणावर युवकांनी भर द्यावा
मीनाक्षी पाटील ;अरिहंत ग्रुपतर्फे रोजगार मेळावा निपाणी (वार्ता) : स्पर्धेच्या युगात युवकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे रोजगाराच्या संधींमध्येही बदल होत आहेत. त्यामुळे युवकांनी संगणक ज्ञान, संवाद कौशल्य आणि आधुनिक तांत्रिक शिक्षणावर भर दिल्यास भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ …
Read More »पत्रकारितेच्या निष्ठेला मानवंदना, दिवंगत पत्रकार विठ्ठलराव पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन
संकेश्वर (प्रतिनिधी) : समाजातील अन्याय, समस्या आणि सामान्य जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या पत्रकारांचे कार्य हे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांइतकेच महान आणि जबाबदारीपूर्ण आहे, असे गौरवोद्गार प्रकाश आवलक्की यांनी काढले. येथील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत विठ्ठलराव बाळू पाटील यांच्या ७ व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत …
Read More »हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरीच्या तपासासाठी निपाणी पोलीस प्रशासनाला नागरिकांचे निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यातील साखर चोरीप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपास जलद गतीने होण्यासाठी माजी आम. प्रा. सुभाष जोशी, संचालक सुकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांना निवेदन देण्यात आले. याविषयी माहिती देताना माजी आमदार प्रा. जोशी म्हणाले, श्री. हालसिध्दनाथ …
Read More »शत्रूंचे मनसुबे उधळण्यासाठी हिंदू समाज एकवटण्याची गरज
श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक; निपाणीत हिंदू एकता सभा निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नाव नसून एक प्रचंड विचारशक्ती आहेत. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य आणि कुटुंबाचे सुख पणाला लावले. स्वातंत्र्यानंतरच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सावरकरांना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा विचार हा काल, आज आणि …
Read More »जमिनीच्या वादातून सहा जणांची गोळ्या झाडून हत्या; विजापूर जिल्ह्यात खळबळ
विजापूर : जमिनीच्या जुन्या वादातून सहाजणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी घडली. भर दिवसा झालेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे आणि गोलगी कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून …
Read More »‘वन ग्रॅम’ सोन्याच्या दागिन्यांना निपाणीकरांची पसंती
सोन्या चांदीच्या दरवाढीचा परिणाम; कमी खर्चात आकर्षक दागिने उपलब्ध निपाणी (वार्ता) : वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याने मोठा आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे वन ग्रॅम सोन्याचे दागिने हा पर्याय महिलांसाठी दिलासा ठरत आहे. कमी खर्चात आकर्षक, हलके आणि आधुनिक डिझाइन उपलब्ध होत असल्याने या दागिन्यांची निपाणी सराफ बाजारात मागणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta