Sunday , September 20 2026
Breaking News

पावसाळ्यात सतर्क राहा, विजेचा अपघात टाळा

Spread the love

 

हेस्कॉमचे आवाहन; तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून राहा दूर

निपाणी (वार्ता) : पावसाळ्यात पाऊस व वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, विजेचे खांब कोसळणे, रोहित्र कोसळणे विद्युत प्रवाह (करंट) उतरणे अशा घटना घडतात. अशावेळी काही प्रसंगी अनेक दुर्घटना ही घडले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणारे संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी सजग राहण्यासह खबरदारी घेण्याचे आवाहन येथील हेस्कॉमचे अभियंते निखिल दुग्गाणे यांनी केले आहे.
मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे तुटलेल्या फांद्या वीजवाहिनीच्या तारांवर अडकून पडल्या असल्यास त्या स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. झाडे पडल्याने विजेचा खांब वाकले अथवा मोडल्यास विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध रहावे. त्यांना हटवण्याचा प्रयत्न करू नये. घरात बसवलेल्या मीटरवर पाणी पडत असल्यास किंवा मीटर असलेली भिंत ओली असल्यास त्वरित कार्यालयाला कळवावे. अपार्टमेंटच्या मीटर बॉक्सची स्वच्छता राखावी. घरामध्ये असलेली विद्युत यंत्रणा व घराजवळ असलेली अर्थिंग मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून तपासून घेण्याचे आवाहनही हेस्कॉमने केले आहे.
——————————————————————-
‘पावसाळ्यात विजेच्या पोलला हात लावू नका. खांबाच्या स्टेवायरला गुरे-ढोरे बांधू नका. त्यावर कपडे वाळत घालू नये.
स्वीच बोर्डापासून मोटारीपर्यंत जाणाऱ्या वायरला जोड देऊ नका. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्वीच तत्काळ बंद करा.
घरावरील डिश किंवा अँटेना वीज तारांपासून दूर ठेवल्यास विजेपासून धोका होणार नाही.’
-निखिल दुग्गाणी,
हेस्कॉन अभियंते, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *