Sunday , July 26 2026
Breaking News

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या मास्टर वेदांतची रौप्यपदकाला गवसणी

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प-बेळगाव येथील राष्ट्रीय जलतरणपटू मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने कर्नाटक स्विमिंग असोसिएशन आयोजित NRJ State Sub-Junior Swimming Championship 2026–27 या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 14 वर्षांखालील मुलांच्या 200 मीटर बटरफ्लाय (Butterfly) प्रकारात द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) पटकावून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
दि. 3 ते 5 जुलै 2026 या कालावधीत येम्मेकेरे स्विमिंग पूल, मंगळुरू येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील उत्कृष्ट जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत वेदांतने 2 मिनिटे 21.70 सेकंदांची उत्कृष्ट वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीनंतर राज्यस्तरावरही वेदांतने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे एस.एम.सी. चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रो. श्री. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे यांनी वेदांतचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांनी वेदांतच्या या अभिमानास्पद यशाबद्दल त्याचे विशेष अभिनंदन करून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *