Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीतील खराब सीडी वर्क ‘मॅनहोल’ ठरताहेत जीवघेणे

Spread the love

 

शहरातील विविध रस्त्यावरील परिस्थिती; लहान मोठे अपघात सुरूच

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी ‘मॅनहोल’ उघड्या अवस्थेसह खराब झाले आहेत. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या उघड्या ‘मॅनहोल’च्या लोखंडी जाळ्या तुटल्या असून त्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या ‘मॅनहोल’ मध्ये पाणी साचल्यास किंवा अंधार असल्यास वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले असून वाहनधारकासह नागरिक किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. तरीही नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


स्थानिक व्यापारी, नागरिक आणि वाहनचालकांनी अशा धोकादायक आणि खराब ‘मॅनहोल’बाबत नगरपालिकेकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र पालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यावरच पालिका प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेत शासन नियुक्त माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण यांनी यांनी संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावरील भीषण परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या ‘मॅनहोल’मुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, हे ओळखून त्यांनी संबंधित अभियंत्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावर मजबूत झाकण बसविण्याची मागणी केली आहे.
दुरुस्तीचे काम होईपर्यंत नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी बॅरिकेड्स आणि योग्य ते धोक्याचे फलक लावण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. पालिका प्रशासनाने यावर तात्काळ पावले उचलली नाहीत, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा चव्हाण यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *