Sunday , September 20 2026
Breaking News

डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे दुर्लक्ष; नामदेवराव चौगुले

Spread the love

 

कुर्लीत ‘वाचन कट्टा’ उपक्रमाचा प्रारंभ

निपाणी (वार्ता) : डिजिटल क्रांतीमुळे वाचनाकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि ज्ञानाची आवड निर्माण करून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी वाचन गरजेचे असल्याचे मत निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांनी व्यक्त केले. एचजेसी चीफ फौंडेशन व मुंबई येथील राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कुर्ली येथे वाचन कट्टा व समृद्ध ग्रंथालय उपक्रम सुरू करण्यात आले आहे. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चौगुले बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
ए. ए. चौगुले यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात वाचन कट्टा उपक्रमाची माहिती दिली. रोपास जलार्पण करुन उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. टी. एम. यादव यांनी, विद्यार्थ्यांना नियमित वाचनाचे महत्त्व, पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकासातील वाचनाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन ज्ञानसमृद्ध, विचारशील आणि संस्कारक्षम पिढी घडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिवाय या उपक्रमांतर्गत परिसरातील विद्यार्थ्यांना दर आठवड्याला विविध पुस्तके, कथा, चरित्रे, विज्ञानविषयक लेख, वर्तमानपत्रे आणि प्रेरणादायी साहित्याचे वाचन करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी वाचनसाहित्य पुस्तक प्रदर्शन, कथा, कविता वाचन आणि मुक्त चर्चा अशा विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले. विजेत्या स्पर्धाकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमास फौंडेशनचे उपाध्यक्ष सज्जन पाटील, ए. एस. चौगुले, एस. एस. साळवी, के. ए. नाईक, एस. एस. देसाई यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. एस. ए. पाटील सूत्रसंचालन केले. एस. टी. शिंदे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *