Monday , September 21 2026
Breaking News

धोनीला बेळगावला बोलवा; भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आगळीवेगळी मागणी

Spread the love

 

बेळगाव : शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना बेळगावला आमंत्रित करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी आगळीवेगळी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाने केलेल्या प्रभावी कार्याचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली.

विद्यार्थ्यांच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना सुरू असल्याची माहिती दिली. या विषयासंदर्भात लवकरच होणाऱ्या अधिकृत बैठकीस विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रण देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच महेंद्रसिंग धोनी यांना बेळगावला आमंत्रित करण्यासाठीही प्रशासनाकडून प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

भेटीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जिल्हाधिकाऱ्यांना आंब्याचे रोपटे भेट दिले. विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीव, नागरी जबाबदारी आणि सकारात्मक उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

या वेळी देविका खन्नुकर हिने भेटीमागील उद्देश स्पष्ट केला. तिच्यासह शिवतेज खन्नुकर, अहिल्या होसूरकर, अर्जुन होसूरकर, सार्थक सायनेकर, वैभवी सायनेकर, शंतनू खन्नुकर, शर्वरी खन्नुकर, अथर्व संतोष पवार, अदिती साळुंखे, अनन्या साळुंखे, स्वराज खन्नुकर, रुदिता पवार, स्वयं पवार तसेच अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *