Sunday , September 20 2026
Breaking News

“छोट्या-छोट्या गोष्टींत आनंद शोधा, भरपूर हसा; आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” : डॉ. प्रकाश फडणीस

Spread the love

 

बेळगाव: “प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव हे असतातच, दुःख कोणालाही चुकलेले नाही, पण त्यातही आनंदी जगण्याचे अनेक पर्याय आपल्याला शोधता येतात, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधा, भरपूर हसा, हसण्याने तणाव कमी होतातच पण त्याबरोबरच कमालीचे शारीरिक व मानसिक लाभ मिळतात” असे विचार डॉ. प्रकाश फडणीस यांनी बोलताना व्यक्त केले.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आयोजित डॉक्टर्स डे कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून “सांगा कसं जगायचं” या विषयावर बोलताना डॉ. प्रकाश फडणीस यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे विचार दिले. जायंट्स भवनात सोमवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जायंटसचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे हे होते. व्यासपीठावर संजय पाटील, अरुण काळे व विश्वास पवार हेही उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. प्रकाश फडणीस, डॉ. अनिल पोटे, डॉ. किरण पाटील, डॉ. योगीता करोशी व डॉ. सतीश भोबे अशा सहा डॉक्टर्सचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. डॉक्टर्सचा परिचय मधु बेळगावकर, विश्वास पवार, जयंत पाटील, आकाश लाटुकर, वाय एन पाटील व सुनील चौगुले यांनी करून दिला. सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले तर विजय बनसुर यांनी आभार मानले. कार्यक्रमास जायंट्स सदस्य आणि डॉक्टर्सचे नातेवाईक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *