Sunday , September 20 2026
Breaking News

मुसळधार पावसाचा इशारा; बेळगावसह सात जिल्ह्यांना रेड अलर्ट

Spread the love

 

बेळगाव : राज्यात मान्सूनचा जोर कायम असून, किनारपट्टी आणि मलेनाडू भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) बेळगावसह उडुपी, दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, शिवमोग्गा, चिक्कमंगळूर आणि कोडगू या सात जिल्ह्यांसाठी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०४.४ मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पावसाचा जोर अधिक असलेल्या तालुक्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, ७ ते ११ जुलैदरम्यान पश्चिम घाट परिसरात भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नदी-नाले, धरणे आणि सखल भागांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *