Sunday , September 20 2026
Breaking News

हनिवेल शाळेला दुहेरी मुकूट; देवेंद्र जिंनगौडा, शांतिनिकेतन शाळेना विजेतेपद

Spread the love

 

बेळगाव : खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेच्या मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत विविध गटात हनिवेल स्कूलने दुहेरी मुकुट संपादन केले तर शांतिनिकेतन पब्लिक स्कूल, देवेंद्र जीनगौडा स्कूल यांनी हि विजेतेपद पटकाविले.

प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत देवेंद्र जिंनगौडा शाळेने शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा 15- 12, 15 -10 असा पराभव केला, मुलींच्या गटातील अंतिम लढतीत हनिवेल स्कूलला प्रतिस्पर्धी नसल्यामुळे विजेतेपद देण्यात आले, 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलने देवेंद्र जीनगौडा स्कूलचा 17-15 13 -15, असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले, तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत हनिवेल स्कूल खानापूरने एसपीएस शांतिनिकेतन पब्लिक स्कूल चा 15 -10,15- 8 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेच्या बक्षिस समारभाला प्रमुख पाहुणे शांतीनिकेतन शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका अक्षया पाटील, प्रतीक्षा पाटील, श्रीकांत पाटील.
शाळेच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा भोसले, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, शांतिनिकेतन शाळेचे क्रीडाशिक्षक ओमकार गावडे, सागर कोलेकर, शिवकुमार सुतार, स्वाती सावंत, हसनसाहब तिगडी, शिवकुमार, पज्वल या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या संघाची आगामी होणाऱ्या विद्याभारती राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *