Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी भागात पावसाचा अंदाज बांधणे कठीण

Spread the love

 

तालुक्यातील ग्रामपंचायती पर्जन्यमापक यंत्राविना ; शेतकरी, नागरिकातून नाराजी

निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला तालुकाच्या दर्जा मिळाला आहे. तालुका पातळीवरील सर्व कार्यालय या ठिकाणी सुरू झाली आहेत. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पर्जन्यमापक यंत्रणा कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयात नाही. याशिवाय येथील सार्वजनिक बांधकाम खाते आणि रयत संपर्क करात असलेले पर्जन्यमापकी ही काही महिन्यापूर्वी खराब झाले आहेत. त्यामुळे यंदाही पावसाचा अचूक अंदाज मिळणे कठीण झाले आहे. परिणामी शेतकरी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. निपाणी मतदारसंघात २८ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी एकाही ग्रामपंचायत मध्ये पर्जन्यमापक यंत्रणेची सुविधा नाही.
येथील सार्वजनिक बांधकाम खाते आणि रयत संपर्क केंद्रामध्ये असलेल्या पर्जन्यमापकावर तालुक्यातील गावांचा भार आहे. या ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या अंदाजावरुन पडलेल्या पावसाचा अंदाज घेतला जातो. पण दोन्ही ठिकाणचे पर्जन्यमापक बंद असल्याने गावनिहाय अचूक माहिती मिळत नाही. परिणामीअनेक गावांमध्ये प्रत्यक्ष नुकसान झाले तरी अधिकृत धरले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा आणि नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेता प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा निर्णय झाला होता. पण, अद्याप यंत्रांची उभारणी झाली नाही. परिणामी शेतकरी व नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
——————————————————————–
‘क्षेत्रफळाच्या तुलनेत पर्जन्यमापक यंत्र सध्या कमी आहे. त्यामुळे पावसाचा अचूक अंदाज येत नाही. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यासाठी वरिष्ठाकडे पाठपुरावा केला जाईल.
-दीपक कौजलगी, कृषी अधिकारी, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *