Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

नांदणीत १ जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक

  जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : नांदणी येथील वृषभाचल पर्वतावर श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान आदिनाथ तीर्थकर यांची ३१ फुट उंच नयनमनोहर ब्रह्ममूर्ती प्रतिष्ठापणा होवून त्रिद्वादश वर्षे पूर्ण होत आहेत. या दरम्यान २४ तीर्थंकर प्रतिष्ठापणा, २४ तीर्थंकर (टोक) चरण पादुका दर्शन, चतुर्मुख जिनबिम्ब व …

Read More »

कंटेनर कारवर पडून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

  नेलमंगल : दोन कार, दोन लॉरी आणि स्कूल बस यांच्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना तुमकूर-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नेलमंगल तालुक्यातील टी. बेगुरुजवळ घडली. कंटेनर कारवर पडल्याने कारमधील 6 जणांचा मृत्यू झाला. वीकेंड सुट्टी असल्याने दुर्दैवी कुटुंब प्रवासावर होते. अपघातादरम्यान कंटेनर कारवर पडल्याने कारचा पूर्ण चुराडा …

Read More »

खानापूरात उद्या विसावे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन; भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

  खानापूर : शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन खानापूर व गुंफण साहित्य अकादमीतर्फे खानापूर येथील लोकमान्य भवन येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वर मंदिर येथून ग्रंथ दिंडीला सुरवात होणार आहे. तसेच ग्रंथ दिंडीच्या मार्गावर भगव्या पताका व भगवे ध्वज लावून परीसर भगवामय …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर यांची तीन दिवशीय शैक्षणिक रवाना!

  खानापूर : सहल हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा भाग असतो. सहल म्हणजे विद्यार्थी जीवनातील रोमहर्षक अनुभव असतो. मराठा मंडळ शिक्षण संस्था अभ्यासाबरोबर कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांना महत्त्व देणारी शिक्षण संस्था असल्याने अशा शैक्षणिक उपक्रमांना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू या नेहमीच प्राधान्य व प्रोत्साहन देत आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी …

Read More »

खानापूरात रविवारी रंगणार गुंफण साहित्य संमेलन!

  बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) खानापूर येथील लोकमान्य भवन आयोजित करण्यात आलेल्या गुंफण सदभावना मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. तसेच संमेलनाला महाराष्ट्र, गोवा व सीमाभागातील अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. त्यामूळे अनेक ठिकाणी फलक लावण्यासह पताका व …

Read More »

सी. टी. रवी यांना सशर्त जामीन मंजूर

  बंगळूर : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अश्लील भाषा वापरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेले भाजपचे विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने त्यांची तात्काळ सुटका करण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. यामुळे रवी यांच्या समर्थकांनी आनंद साजरा केला. बेळगावातील सुवर्णसौध …

Read More »

बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!

  खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 व 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या शतकपूर्ती निमित्त आयोजित अधिवेशनाला खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय आज शुक्रवारी खानापूर येथील शिवस्मारकात झालेल्या खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूरचे …

Read More »

चिक्कोडी पोलीस स्थानकातील कॉन्स्टेबलचा रस्ता अपघातात मृत्यू

  चिक्कोडी : चिक्कोडी पोलिस स्थानकात कार्यरत असलेले पोलिस हवालदार मंजुनाथ सत्तीगेरी (२६) यांचा मृत्यू झाला आहे. मंजुनाथ हे मूळचे महालिंगपूरजवळील केसरगोप्प गावचे रहिवासी असून गेल्या ५ वर्षांपासून ते चिक्कोडी पोलिस स्थानकात कार्यरत होते. आज कुडची येथून दुचाकीवरून येत असताना अंकली – रायबाग रोडवरील नंदीकुरळी क्रॉसजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात …

Read More »

खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी अमित शहा यांच्या विरोधात “जोडे मारो” आंदोलन

  खानापूर : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी शिवस्मारकाजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले व खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे खानापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. देशवासीयांना ते आदरणीय आहे पण मनुस्मृतीवाल्यांना संविधान …

Read More »

भारतीय सैन्यात नव्याने रुजू होणाऱ्या मराठा मंडळ ताराराणीच्या विद्यार्थिनींचा सत्कार!

  खानापूर : मराठा मंडळ संचलित पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला समस्त शिक्षकवृंदाला दिला असून भारतीय शेतकरी आणि जवान यांच्याप्रती आदर भावना कायम ठेवण्यास उपकृत केले आहे. म्हणूनच आज …

Read More »