निपाणी : कोल्हापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्ग 4 वर सदर बाजार कोल्हापूर येथून गाडी क्रमांक एमएच 42, एम 6224 या बोलोरो पिकप गाडी मधून 2 टन गोमांसची बेकादेशीररित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून मिळाली. यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना सूचना देवून कागलकडे पाठवून दिले. यावेळी गोरक्षण सेवा समिती कागल, येथील ओंकार त्रिगुणे, व गोरक्षक यांनी राष्ट्रीय महामार्ग 4 वरील शेजारी अशोका हॉटेलचा समोर कागल येथे सापळा रचून ही गाडी पोलिसांच्या मदतीने रात्री 10.30 वा. जप्त केली. यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंड यांनी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार साहेब यांनी संपर्क करून मदतीसाठी विनंती केली. यावेळी पोलिस निरीक्षक यांनी मदतीसाठी पोलिसांची तुकडी पाठवून दिली.
यावेळी गाडी चालक आतीक मदार बेपारी याच्यावर कागल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. यावेळी पुढील तपासणीसाठी गोमांस कागल येथील पशु अधिकारी प्रतीक पुरी गोसावी यांनी पुणे येथे पाठवून दिले. जप्त केलेले गोमांस नष्ट करण्यासाठी कागल नगरपालिकेने कचरा डेपो येथे जेसीबीने खड्डा खोदून व केमिकल टाकून जप्त केलेले गोमांस याची विल्हेवाट लावण्यात आली. ही कारवाई करतेवेळी गोरक्षण सेवा समितीचे गोरक्षक सागर श्रीखंडे, ओमकार त्रिगुणे, समरजीत जाधव, अथर्व करंजे, सोहम किंकर, प्रेम त्रिगुणे, पार्थ जाधव, केतन कदम, विशाल मर्दानी, अथर्व कस्तुरे, प्रवीण खंबाळे, गुरुप्रसाद पोकले, सागर कोळेकर, या गोरक्षक आणि ही कारवाई यशस्वी केली कारवाईमध्ये कागल नगर परिषद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच कागल पोलीस स्टेशनने ही कारवाई केली. यावेळी गोरक्षण सेवा समितीच्या वतीने गोभक्त व गोसेवकांना आवाहन करण्यात आले की, कुठल्याही प्रकारे गोमाता व गोवंशां तसेच गोमांसची बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना कळवावे असे आव्हान यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी केले.