Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यांपर्यंत मिळेल गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

  नवी दिल्ली : गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. विवाहित किंवा अविवाहित सर्व स्त्रियांना गर्भ राहिल्यापासून 24 आठवड्यांपर्यंत कायदेशीररित्या सुरक्षित गर्भपात करता येऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. याच निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं वैवाहिक बलात्काराविषयीही मत नोंदवलं आहे. महिलेच्या मनाविरुद्ध नवऱ्याने संबंध ठेवल्यामुळे गर्भधारणा …

Read More »

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून अशोक गेहलोत यांची माघार

  जयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेस आमदारांनी केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटाबाबत सोनिया गांधींची माफी मागितल्याचे गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले …

Read More »

पीएफआयवर केंद्र सरकारकडून बंदी

  नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI), त्यांच्या सहकारी संघटना आणि सर्व आघाड्या बेकायदेशीर घोषित केल्या आहेत. केंद्राने या सर्वांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचं अधिकृत पत्रही प्रसिद्ध केलं आहे. पीएफआयवर बंदी घालण्याची तयारी आधीच सुरू झाली होती, त्यानंतर गृह मंत्रालयाने हा …

Read More »

सत्तासंघर्षावर सुनावणी: सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेंना दिलासा, ठाकरेंना धक्का

निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती नाही नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज शिंदे गटाला दिलासा मिळाला, तर उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे पक्षचिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगाच्या कोर्टातच लढली जाणार आहे. दुसरीकडे आमदारांची अपात्रता, पक्षांतर …

Read More »

देशात दुसर्‍यांदा टाकलेल्या छाप्यात पीएफआयचे 247 जण ताब्यात

  नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज दुसर्‍यांदा पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत 247 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात 44, कर्नाटकात 72, आसाममध्ये 20, दिल्लीत 32, महाराष्ट्रात 43, …

Read More »

आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

  पुणे : केंद्र सरकारकडून ’दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ जाहीर करण्यात आला असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी याबाबत घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख ठरल्या आहेत. ठाकुर यांनी त्यांच्या नावाची घोषणा करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार केंद्रीय माहिती …

Read More »

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर

  पटियाला : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर केलं होतं. सक्तवसुली संचालनालयाने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट’ नुसार सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल …

Read More »

ऐन सणासुदीत गॅस दरवाढीचा भडका उडणार!

  नवी दिल्ली : जनतेच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. आता नागरिकांना गॅस महागाईचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. या आठवड्यात होणार्‍या पुनरावलोकनानंतर नैसर्गिक वायूच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नैसर्गिक वायूचा वापर वाहनांसाठी वीज, खते आणि सीएनजी निर्मितीसाठी केला जातो. यामुळे नैसर्गिक वायूचे दर वाढल्याने सीएनजीचे …

Read More »

हिमाचल प्रदेशमधून टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून 7 ठार

  कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला आहे. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ हा अपघात झाला आहे. एक टेम्पो …

Read More »

इराणमधील हिजाबविरोधी आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार; आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू

तेहरान : इराणमध्ये हिजाब व्यवस्थित न घातल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्यापासून मोठे आंदोलन पेटले आहे. महिलांकडून हिजाबला विरोध केला जात आहे. आंदोलनाला १० दिवस उलटल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणीचा मृत्यू झाल्याने आंदोलनाची आग अधिकच भडकली आहे. या तरुणीचं नाव हदीस नजफी असल्याचं …

Read More »