जयपूर : काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सक्रिय झाले आहेत. एकीकडे खासदार शशी थरूर हे देखील पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत असताना अशोक गेहलोत यांनी आज रात्री 10 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत हे उमेदवार असू …
Read More »कर्नाटक हिजाब प्रकरणः सुप्रीम कोर्टात एसजी मेहतांचा जोरदार युक्तिवाद, कुराणात फक्त हिजाबचा उल्लेख पण..
नवी दिल्ली : कर्नाटक हिजाब वादावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात जोरदार चर्चा झाली. राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी कोर्टात युक्तिवाद केला की याचिकाकर्ते हिजाब अनिवार्य धार्मिक प्रथा असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत. इराणसारख्या अनेक इस्लामिक देशांमध्ये महिला हिजाबविरोधात लढा देत आहेत. त्यामुळे हिजाब ही अनिवार्य धार्मिक …
Read More »तैवानमध्ये भूकंप; रस्त्यांना तडे, ब्रिज कोसळले, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
तैवान : तैवानमध्ये गेल्या 24 तासात तीन वेळा भूकंप आला आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैवानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंटी भूकंपाचं मुख्य केंद्र आहे, शनिवारी याच भागात 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी 6.8 रिश्टर स्केल …
Read More »मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल
मोहाली : पंजाबच्या मोहालीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीनं इतर विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचं समोर आलं …
Read More »महंत नरेंद्र गिरींच्या खोलीत सापडले ३ कोटी रोख, ५० किलो सोने, १३ काडतुसे
प्रयागराज : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करत असलेले सीबीआयचे पथक हे गुरुवारी प्रयागराज येथील बागंबरी मठात पोहोचले. महंत नरेंद्र गिरी यांची सील केलेली खोली सीबीआय पथक, पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंतांच्या खोलीतून ३ कोटी रुपये …
Read More »सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी सीबीआयने नोंदवला गुन्हा, पथक उद्या गोव्याला जाणार
पणजी : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआयचे पथक उद्या गोव्यात जाणार आहे. गोवा सरकारने सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर सोमवारी गृह मंत्रालयाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी डीओपीटी मंत्रालयाला पत्र लिहिले. सोनाली फोगाट …
Read More »गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या 8 आमदारांचा भाजप प्रवेश
पणजी : गोव्यात अखेर काँग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश आलं आहे. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या अवघ्या एक वर्षाच्या आतच गोव्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे …
Read More »लिफ्ट तुटल्यामुळे सात मजुरांचा जागीच मृत्यू
अहमदाबाद : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून सात मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-2 नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही …
Read More »शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन
नवी दिल्ली : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन झाले आहे. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे देश-विदेशात भक्त आहेत. मध्य प्रदेशमधील महाकौशल झोनमधील …
Read More »प्रकाश जावडेकर, विनोद तावडे व पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपची नवी जबाबदारी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा कंबर कसत असून आज पक्षाने विविध राज्यांतील ’सेनापतीं’ची नियुक्ती केली आहे. भाजपाने 15 राज्यांमध्ये आपले नवे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, जेपी नड्डा यांनी नावांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे आणि ही यादी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta