बेळगाव : बेळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात भरदुपारी एका रिक्षाने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली. विशेष म्हणजे, ही आग अपघाती नव्हती, तर हेतुपुरस्सर रिक्षा पेटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. बेळगावच्या कोल्हापूर सर्कल परिसरात असलेल्या अयोध्या नगर येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. अचानक …
Read More »नरेगा कामगारांच्या थकीत वेतनासाठी आंदोलन
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील मरकुंबी येथील नरेगा कामगारांनी त्यांच्या थकीत वेतनासाठी आंदोलन छेडले. जिल्हा पंचायतीसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाच्या नेतृत्त्वाखाली कामगारांनी जोरदार निदर्शने केली. नरेगा कामगारांचे वेतन गेल्या ४ महिन्यांपासून थकीत आहे, त्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामगारांना लवकर वेतन द्यावे आणि …
Read More »बेळगावचे रस्ते १५ दिवसात स्वच्छ करा : मनपा आयुक्तांचे कडक निर्देश
बेळगाव : बेळगाव महानगर आणि ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांच्या कडेला कचरा टाकण्याऐवजी ओला आणि सुका कचरा वेगळा करून कचरा व्यवस्थापन केंद्राला द्यावा. पुढील १५ दिवसांत सर्व रस्ते कचऱ्यापासून मुक्त करावेत, असा खडसावणारा इशारा आज बेळगाव महानगरपालिकेच्या बैठकीत मनपा आयुक्तांनी दिला. शहर -परिसर, ग्रामपंचायत अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांवर मोठया प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले …
Read More »दैनंदिन कामांसोबत शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्त्वाचे : डॉ. राजश्री अनगोळ
तारांगण, अखिल भारतीय साहित्य परिषद आणि जननी ट्रस्टच्या वतीने कर्तृत्वाचा कौतुक सोहळा उत्साहात संपन्न बेळगाव (प्रतिनिधी) : आरोग्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस सतत व्यस्त असतो. मात्र, दैनंदिन कामांबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राजश्री अनगोळ यांनी व्यक्त …
Read More »६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण
बेळगाव : मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणाऱ्या ६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनची तयारी जोरात सुरू झाली आहे. या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण आज मराठा मंदिर, बेळगाव येथे उत्साहात पार पडले. साहित्यप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण गोपाळराव बिर्जे (अध्यक्ष, मराठा जागृती मंच, बेळगाव) …
Read More »बहुप्रतीक्षित हुतात्मा स्मारक भवनाचा भूमिपूजन सोहळा 30 मार्च रोजी
बेळगाव : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या जागे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने हुतात्मा भवन उभारणी करण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रसिद्ध सिव्हिल इंजीनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. …
Read More »गुढीपाडव्यानिमित्त 30 मार्च रोजी भव्य दिव्य शोभयात्रेचे आयोजन!
बेळगाव : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्व- स्वरूप संप्रदायच्या वतीने रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी वडगांव ते जुने बेळगांव येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य दिव्य शोभयात्रेचे आयोजन केले आहे. “अनंत विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम रत्नागिरी” यांच्या दिव्य प्रेरणेने …
Read More »चव्हाट गल्ली येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरात शनिवार दिनांक 29/3/2025 रोजी सकाळी 6 ते 8 पर्यंत विजया ऑर्थो अँड ट्रुम सेंटर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रवी पाटील व बेळगावचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्लीतर्फे संयुक्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी 6 ते …
Read More »संपगाव परिसरात बिबट्याचा वावर, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील संपगाव आजूबाजूच्या मुतली परिसरात एका शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. वन विभागाच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नजरेत आहे. यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संपगाव व पट्टीहाळ गावात बिबट्याने ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. बिबट्याने संपगाव जवळ कुत्रा आणि कोल्ह्याची शिकार केल्याची माहिती समोर …
Read More »वीज कोसळून एकाचा मृत्यू; बैलहोंगल येथील घटना
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील सुतगट्टी गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बसवराजा नागप्पा सांगोळ्ळी (४५) असे मृताचे नाव आहे. बसवराज यांच्या पत्नीसह अन्य दोघे जखमी झाले. त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतातील काम आटोपून घरी परतत असताना वीज पडल्याने ही …
Read More »