Monday , December 8 2025
Breaking News

बेळगाव

खाजगी शाळांप्रमाणे सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण द्या : शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा

  शिक्षण विभागाची प्रगती आढावा बैठक बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, सरकारी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश वाढले पाहिजेत. संबंधित अधिकाऱ्यांनी खाजगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळा चालवून मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दिशेने काम करावे, असे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि साक्षरता विभागाचे मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले. मंगळवार दि. ०८ जुलै सुवर्ण विधान सौध सभागृहात …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त डी. वाय. सी. भरतेश शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

  बेळगाव : बेळगाव येथील डी. वाय. सी. भरतेश शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ श्री. एम. बी. बखेडी आणि सर्व …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट हिंदवाडी आणि बी. के. बांडगी ट्रस्टच्या वतीने यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान रविवारी!

  बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट हिंदवाडी आणि बी. के. बांडगी ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमाच्या हायस्कूलमधून दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीना रोख रकमेचा पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्याचा कार्यक्रम रविवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 10.30 वा निश्चित केला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

विजेचा धक्का बसून हेस्कॉम कर्मचाराचा मृत्यू; तब्बल तीन तास मृतदेह लटकतच!

  यरगट्टी : ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेल्या हेस्कॉम कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला पण खेदाची बाब म्हणजे तब्बल तीन तासाहून अधिक वेळ लटकत असलेल्या मृतदेहाजवळ कोणीही फिरकले नाहीत. ही धक्कादायक घटना यरगट्टी तालुक्यातील मुगळीहाळ गावात घडली. बगरनाळ गावातील मारुती आवळी (२५) हा हेस्कॉम कर्मचारी मुगळीहाळ गावात विजेच्या खांबावर …

Read More »

शनी वक्री, रविवार दि. १३ जुलै

    बेळगाव : न्याय आणि कर्माचा देव म्हणून ओळखला जाणारा शनी देव रविवार दि. १३ जुलै रोजी मीन राशीत वक्री होणार आहे. त्या नंतर शनी पुन्हा मीन राशीत भ्रमण करेल. एकूण १३१ दिवस शनी वक्री स्थितीत राहणार आहे. शनी वक्री स्थितीत राहिल्यामुळे त्याचे अनुकूल आणि प्रतिकूल असे परिणाम पुढील …

Read More »

रोटरी दर्पणच्या नूतन कार्यकारिणीचा शुक्रवारी अधिकारग्रहण समारंभ…

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे वर्ष २०२५ -२६ साठी नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ शुक्रवार, ११ जुलै २०२५ रोजी सायं. ४:०० वाजता, लॉर्ड्स इको इन, बेलगाम येथे होणार आहे. या समारंभात नूतन अध्यक्षा रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी, सचिव रोटेरियन कावेरी करूर, कोषाध्यक्ष …

Read More »

विविध मागण्यांसाठी बेळगाव महानगरपालिकेसमोर पालिका कर्मचाऱ्यांची निदर्शने

  बेळगाव: कर्नाटक राज्य महानगरपालिकेने दहा महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी बेळगाव महानगरपालिकेसमोर आज महापालिका कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. आज बेंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे कर्नाटक राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना ७ …

Read More »

बेंगलोर येथे राज्यस्तरीय कार्यक्रमात विजय मोरे यांचा सत्कार

  बेळगाव : राजधानी बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एका विशेष राज्यस्तरीय समारंभात सार्वजनिक सेवा आणि समाजाला मदत करण्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल बेळगावचे माजी महापौर आणि आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. समुदाय साहित्य मत्तू संस्कृती प्रतिष्ठान, बेंगलोर आणि श्री सिद्धगंगा मठ, तुमकुरू यांनी या …

Read More »

बेळगावहून गोव्याला बेकायदेशीररित्या घेऊन जाणारे गोमांस जप्त, बेळगाव येथील दोघांना अटक

  रामनगर : बेळगावातून गोव्याला बेकायदेशीररित्या घेऊन जात असलेले अंदाजे 6 लाख 7 हजार 500 रुपये किमतीचे 1930 किलो गोमांस रामनगर पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, एक मुख्य आरोपी फरार आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक महंतेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सिद्धप्पा …

Read More »

श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन आयोजित “अभंगवाणी”ला उत्स्फूर्त दाद

  बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनतर्फे आयोजित भक्तीरसपूर्ण “अभंगवाणी” कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. स्वरांजलीचे गायक विनायक मोरे आणि अक्षता मोरे यांच्या सुश्राव्य गायनाने उपस्थित रसिक श्रोते भारावून गेले. त्यांना सिंथेसायझरवर संतोष पुरी, तबल्यावर नारायण गणाचारी व ऑक्टोपॅडवर स्नेहल जाधव यांनी अप्रतिम साथसंगत दिली. प्रारंभी …

Read More »