Tuesday , April 1 2025
Breaking News

बेळगाव

दुकान लावण्यावरून भांडण; एकाने दुसऱ्याचे नाक कापले..

  बेळगाव : बेळगाव शहरातील खाडे बाजार येथील खंजर गल्ली येथे फूटपाथवर दुकान लावण्यावरून झालेल्या गदारोळाचे रूपांतर हाणामारीत झाले असून एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराचे नाक कापल्याची घटना घडली आहे. पीडित सुफियान पठाण (४२) हे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना, अयान देसाई या दुकानदाराशी बाचाबाची झाली. यावेळी देसाई यांनी चाकू …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची उद्या बैठक

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक उद्या सोमवार दि. 31 रोजी सायंकाळी ठीक 7 वा. बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी होणार आहे. म. ए. समितीची कार्यकारिणी अंतिम निवड होणार आहे. तरी येळ्ळूर म. ए. समितीच्या आजी – माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, …

Read More »

गायक व संगीत शिक्षक विनायक मोरे परिवाराचा काकडे फौंडेशनच्यावतीने हृद सत्कार समारोह

  बेळगाव : काकडे फौंडेशनच्यावतीने प्रथितयश गायक व संगीत शिक्षक श्री विनायक मोरे, सौ. अक्षता मोरे, स्वरा व श्रीशा यांचा खास सत्कार करून सन्मानीत करण्यात आले. गुढी पाडव्यानिमित्त काकडे फौंडेशनच्या दहाव्या वर्षपूर्तीप्रीत्यर्थ (2015- 2025) ज्येष्ठ संगीततज्ञ व श्री मोरेंचे गुरु पंडित नंदन हेर्लेकर यांच्या शुभहस्ते शाल, फळकरंडी, भेटवस्तू तसेच श्रीमती …

Read More »

शुभम शेळके यांच्या पाठीशी मराठी भाषिकांनी उभे रहावे; म. ए. युवा समिती सीमाभागाचे आवाहन

  बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या शुभम शेळके यांच्या पाठीशी राहुन अन्यायाविरुद्ध प्रत्येक मराठी भाषिकांनी आवाज उठविण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या माध्यमातून संघटना म्हणून युवा समिती सीमाभाग शुभम शेळके यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : भविष्यात बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना पिण्याच्या पाण्याच्या सुरळीत पुरवठ्यासाठी तातडीचे उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात कुठेही दुषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी नियमित तपासणी …

Read More »

पीजी विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण; संशयित ताब्यात

  बेळगाव : विजयपूर येथील एमबीएची विद्यार्थिनी ऐश्वर्या लक्ष्मी हिने बेळगावातील पीजी रूममध्ये आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. तरूणीच्या आत्महत्येमागचे कारण अशी माहिती आहे की, विजयपूर जिल्ह्यातील चडचन येथे राहणाऱ्या ऐश्वर्या लक्ष्मी व आकाश यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होते. पण आकाश हा दुसऱ्याच …

Read More »

श्वानाने केले छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन!

  बेळगाव : धर्मासाठी बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचा आज अंतिम दिवस आहे. या निमित्ताने बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यादरम्यान एका पोलिस श्वानाने महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात देखील यानिमित्ताने विशेष पूजा पार …

Read More »

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली विकासकामांची पाहणी

  बेळगाव : बहुतेक लोकप्रतिनिधी केवळ कोनशिला बसवण्यापुरतेच मर्यादित राहतात, पण महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वतः विकासकामांची गुणवत्ता आणि प्रगती तपासण्यासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेत विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली. हिंडलगा विजय नगर येथे सध्या श्री गणपती मंदिराचे बांधकाम सुरू असून या कामाच्या प्रगतीचा …

Read More »

बेळगावमध्ये २०० हून अधिक राऊडी शिटर्सची परेड

  बेळगाव : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या १० वर्षांत कोणत्याही गुन्ह्यात सामील नसलेल्या १० जणांची नावे राऊडी शिटर यादीतून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी आयोजित राऊडी शिटर परेडनंतर पोलिस आयुक्त ययाडा मार्टिन मार्बनयांग यांनी ही माहिती दिली. शनिवारी बेळगाव जिल्हा पोलीस मैदानावर …

Read More »

शुभम शेळके यांना तडीपारची नोटीस!

  बेळगाव : मराठी भाषेसाठी व सीमा प्रश्नासाठी लढणाऱ्या युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी तडीपारची नोटीस बजावली आहे. या नोटीसीवरून त्यांना जिल्हा बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी देखील मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कर्नाटक प्रशासनाने आपले मराठी द्वेष्टे पण दाखवत शुभम शेळके या युवा …

Read More »