Friday , November 22 2024
Breaking News

बेळगाव

मराठी विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश

  बेळगाव : बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये बैलहोंगल येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक मुलांच्या गटात रितेश मुचंडीकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात शाळेची विद्यार्थिनी श्रावणी …

Read More »

ऑटोनगर येथे कारखान्याला भीषण आग

  बेळगाव : येथील ऑटो नगर येथील कारखान्याला शनिवारी रात्री अचानक आग लागली. ऑटोनगर येथील कणबर्गी औद्योगिक परिसरातील प्रदीप इंडस्ट्रियल पॅकर्स या कारखान्याला रात्री 10.45 च्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून आगीचे कारण आणि नुकसान याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही.

Read More »

श्री दुर्गामाता दौडीचा तिसरा दिवस उत्साहात

  बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडीचा तिसरा दिवशी उत्साहात पार पडला. प्रसन्न वातावरण, दुमदुमणाऱ्या घोषणा आणि ध्येयमंत्राने वातावरणात स्फुरण चढले होते. युवक – युवती आणि अबालवृद्धांसह दिव्यांगांच्या उपस्थितीतने हि दौड विशेष लक्षवेधी ठरली. देव, देश आणि धर्मरक्षणाच्या संदेश देण्यासाठी आयोजिण्यात आलेली श्री दुर्गामाता दौड राणी चन्नम्मा …

Read More »

रुद्राप्पा अंगडी यांचा टपाल सेवा निवृत्ती निमित्त सत्कार

  बेळगाव : शहापूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेले रुद्राप्पा वीरभद्रप्पा अंगडी 38 वर्षाच्या पोस्ट विभागातील सेवे नंतर निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. रुद्राप्पा अंगडी हे मूळचे तिगडी गावचे. त्यांनी आपल्या मूळ तिगडी गावी सत्तावीस वर्षे पोस्ट सेवा बजावली. त्यानंतर शहापूर बॅरिस्टर नाथ पै येथील पोस्टात …

Read More »

दोन अस्वलांच्या हल्ल्यात मुंडवाड येथील शेतकरी गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मुंडवाड गवळीवाडा येथील शेतकरी विनोद जाधव (वय 46) हे पहाटे आपल्या शेताकडे जात असताना दोन अस्वलानी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविल्याने ते गंभीर झाले रुग्णवाहिकेतून उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, आज पहाटे सदर शेतकरी आपल्या शेताकडे जात …

Read More »

पायोनियर बँकेच्या हिंडलगा शाखेचे उद्या उद्घाटन

  बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या येथील पायोनियर अर्बन बँकेची पाचवी आणि बेळगाव तालुक्यातील पहिली शाखा हिंडलगा येथे रविवारी समारंभपूर्वक सुरू होत आहे. पायोनियर बँकेच्या सध्या कलमठ रोड बेळगाव येथील मुख्य शाखा, मार्केट यार्ड, गोवावेस आणि शहापूर अशा चार शाखा कार्यरत असून …

Read More »

सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना लक्ष्य!

  बेळगाव : डिजिटल अरेस्टच्या प्रकारानंतर सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना आपले लक्ष्य बनविले आहे. पोषण अभियान अंतर्गत नावे नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांच्या बँक खात्यातील रक्कम गायब करण्याचा सपाटाच गुन्हेगारांनी सुरू केला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गेल्या आठवड्याभरात बेळगाव शहर व उपनगरात आठहून अधिक गर्भवती महिलांच्या बँक खात्यातून …

Read More »

मराठी विद्यानिकेतन येथे राष्ट्रसेवादल शिबिर संपन्न

  सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा सामंत यांची उपस्थिती बेळगाव : दिनांक 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत सुरू असलेल्या मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रसेवा दलाच्या शिबिराची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पत्रकार, दिग्दर्शक व झी मराठीचे …

Read More »

मराठी, इंग्रजी फलक हटवण्यासाठी मनपावर करवेचा दबाव

  बेळगाव : शहरात गणेशोत्सव आणि दसरोत्सवामुळे मराठी आणि इंग्रजी भाषेत फलक लागले असल्यामुळे पोटशूळ उठलेल्या करवे यांनी शुक्रवारी (दि. ४) पुन्हा कोल्हेकुई करत महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल यांच्या वाढदिवसाच्या फलकावर कन्नड फलक लावून कंडू शमवून घेतला. शहर परिसरात मराठी आणि इंग्रजी …

Read More »

हिंडलगा ग्राम पंचायतीने केली मालमत्ता करात १० टक्के वाढ

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या वतीने मालमत्ता करात १० टक्के वाढ केल्याने ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीला घेराव घालून संताप व्यक्त केला. हिंडलगा गावात मालमत्ता करात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. ग्रामस्थांचे हित न जपणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचा काय उपयोग असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. ग्रा पं सदस्यांनी …

Read More »