Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या बेळगाव शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित

  बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात ठिकठिकाणी दिनांक 27 रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील विविध भागात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा नगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्र नगर, तिसरा रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, …

Read More »

जाएंट्स परिवाराचे माजी अध्यक्ष राजू माळवदे यांचे निधन

  बेळगाव – शहापूर सरस्वती रोड येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि जाएंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारचे माजी अध्यक्ष राजू माळवदे (वय 59) यांचे आज मंगळवार दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने धारवाड येथे निधन झाले. राजू माळवदे हे आज धारवाड उच्च न्यायालय खंडपीठाच्या कामकाजासाठी धारवाडला गेले होते. दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने साक्षरता जनजागृती

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने मराठी प्राथमिक शाळा मन्नूर येथे साक्षरता जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हातात साक्षरतेचे फलक घेऊन जनजागृती रॅलीने सुरुवात केली आणि शिवाजी चौकात रॅलीची सांगता झाली. आरसीबी दर्पणच्या अध्यक्षा Rtn. रुपाली जनाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि साक्षरता जागृती मोहिमेचा …

Read More »

जीएसएस महाविद्यालयाच्या 50 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा पुनर्मिलन महामेळावा

  बेळगाव : येथील जीएसएस महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. व्यवस्थापन, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी ही गौरवाची बाब आहे. याबाबतची माहिती माजी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने 28 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या मैदानावर “सक्सेरियंस २४ रीकनेक्ट अँड रिजोईस” हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती …

Read More »

महात्मा फुले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा

  बेळगाव : आद्य समाजसुधारक, स्त्रियांचा पालनहार, क्षुद्राती शुद्रांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षी मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे आंतरशालेय क्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये द. म. शि. मंडळाच्या सर्व शाळांच्या प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच बेळगाव आणि परिसरातील मराठी …

Read More »

बाग परिवारातर्फे कवितांचे बहारदार सादरीकरण

  बेळगाव : बाग परिवारचा नोव्हेंबर महिन्यातील कार्यक्रम रविवार दिनांक 24 रोजी बसवेश्वर गार्डन गोवावेस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सौ. अस्मिता आळतेकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयुष्याचा जोडीदार, लगीनघाई, हिवाळा अशा विविध विषयांवरील सुंदर कवितांचे बहारदार सादरीकरण उपस्थित कवी – कवयित्रींनी मोठ्या उत्साहाने केले. पावसाळ्यानंतर प्रथमच कार्यक्रम …

Read More »

बेळगावातील श्री ज्योतिबा मंदिर उजळले ११ हजार दिव्यांनी…

  बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात दरवर्षी कार्तिक दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदाही या दीपोत्सवाने मंदिराचा परिसर प्रकाशमय करून टाकला. ११ हजार दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसराने एक नव्या तेजाने भरून गेला होता. या निमित्ताने मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध रंगांनी भरलेल्या रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर …

Read More »

भरधाव कारची ट्रॅक्टर ट्रेलरला जोराची धडक; 1 ठार

  बेळगाव : भरधाव कार गाडीने उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रेलरला जोराची धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात हुबळी येथील 1 ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील हलगा ब्रिज जवळ घडली. अपघातात ठार झालेल्या कार मधील दुर्दैवी व्यक्तीचे नांव गिरीश के. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

  बेळगाव : येत्या 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता सह्याद्री सोसायटी कॉलेज रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस …

Read More »

अबकारी खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : बेळगांव ग्रामीण पोलिसानी सावगाव तालुका बेळगांव येथे घातली होती धाड. धाडीत 26 लिटर दारु किंमत रुपये 10,287/- व रोख 800 रु. आरोपीकडून जप्त करण्यात आले होते. बेळगांव ग्रामीण पोलिसात दाखल झालेल्या खटल्यानुसार फिर्यादी संगमेश शिवयोगी सि.पि. आय बेळगांव ग्रामीण पोलिस ठाणा यांच्या फिर्यादीवरून बेळगांव ग्रामीण पोलिस ठाण्याचे …

Read More »