शरद इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यड्राव इचलकरंजीचा अनोखा उपक्रम
बेळगाव : कर्नाटकातल्या सीमा भागात येणार्या 865 गावातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना महाराष्ट्रमध्ये अत्यल्प शैक्षणिक शुल्कामध्ये उच्च दर्जाच्या तांत्रिक शिक्षणाची सुवर्ण संधी.
सीमा भागातील या गावांच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना या शैक्षणिक सवलतीचा लाभ उठवता यावा याकरीता शरद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यड्राव इचलकरंजी एक सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून एक शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. पात्र विद्यार्थ्यांना MHT- CET 2025 परीक्षा फॉर्म व परीक्षा फी मोफत भरण्यास मदत करत आहेत. प्राध्यापक टायगर दिवाकर सांगताना बोलत होते की, संस्थेचे Executive Director श्री. अनिल बागणे हे आमचे प्रेरणास्थान आहेत. साहेबांचा अट्टाहास एकच आहे की कमीत कमी 1000 विद्यार्थी लाभार्थी असले पाहीजेत.
विद्यार्थी हा तांत्रिक शिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे. विद्यार्थी हा उद्योजक बनला पाहिजे. शरद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगसाठी विद्यार्थी हाच केंद्र बिंदु मानून कॉलेज निस्वार्थ सेवा बजावत आहे. आतापर्यंत 400 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अधिक माहिती साठी काॅलेज ॲडमिशन प्रमुख प्रा. टायगर दिवाकर आणि प्रा. आशिष जाधव यांच्याशी संपर्क साधावा.
प्रा. टायगर दिवाकर- 8970160265/7892237292
प्रा. आशिष जाधव- 9730706305
सीमा भागातील सर्व नगरिकांकडून संस्थेचे Executive Director अनिल बागणे यांचे कौतुक होत आहे. अंतिम मुद्दत दिनांक 15 फेब्रुवारी 2025 आहे.