बंगळूर : कोट्यवधी रुपयांच्या बिटकॉइन प्रकरणात प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद नलपाड यांना अटक होण्याची भिती आहे. नलपाड यांचे हॅकर श्रीकीशी व्यावसायिक संबंध होते, असे तपासात आढळून आले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) कलम ४१ अंतर्गत आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्या, (ता. ७) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.
काही महिन्यांपूर्वी, एसआयटी अधिकाऱ्यांनी नलपाड यांची चौकशी केली होती आणि त्यांचे जबाब नोंदवले होते. एसआयटीचे अधिकारी हॅकरने श्रीकीकडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याच्या आरोपांची चौकशी करत होते.
बंगळुरमधील कॉटनपेट हॅकिंग प्रकरणात श्रीकीशी व्यावसायिक संबंध असल्याच्या संशयावरून नलपाडची चौकशी करण्यात आली, कारण तो मुख्य आरोपी हॅकर श्रीकृष्ण उर्फ श्रीकीचा जवळचा असल्याचे सांगितले जात होते. एसआयटीने आता नलपाड हा आरोपी असल्याचे म्हटले आहे.
नलपाड आरोपी
तत्पूर्वी, राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद नलपाड यांची सीआयडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यांचे म्हणणे नोंदवल्यानंतर, नलपाड यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले.
सुनावणीस हजर राहण्याची नोटीस
एसआयटी अधिकाऱ्यसांनी नलपाड यांना नोटीस बजावली आहे, ज्यामध्ये त्यांना श्रीकीसोबतच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांबाबत चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीकृष्ण उर्फ श्रीकीशी संबंध असल्याच्या आरोपावरून नलपाड यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती.
त्यानंतर एक जबाब नोंदवण्यात आला. पण यावेळी, नलपाड यांनाच दोषी ठरवत नोटीस बजावण्यात आली आहे. नलपाड हे आयपीएस अधिकारी वंशी कृष्णा यांच्यासमोर हजर झाले, जे सीआयडीची ई-प्रोक्योरमेंट वेबसाइट हॅक करून सीआयडीची १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी करत होते.