Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते ‘आरोग्य संचारी’ योजनेचा शुभारंभ

  बेळगाव : बेळगाव येथील सुवर्णसौध परिसरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरोग्य विभागाच्या नवीन फिरत्या आरोग्य पथकांना हिरवा झेंडा दाखवून आरोग्य संचारी योजनेचा शुभारंभ केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आणि रस्ते नसलेल्या गावातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एकूण ८१ वाहनांच्या माध्यमातून ही सेवा संपूर्ण राज्यात दिली जाणार …

Read More »

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत हलकारे भगिनींची सुवर्ण कामगिरी

  बेळगाव : बेळगावच्या हलकारे भगिनींनी 69 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये दमदार कामगिरी करत शहराचा नावलौकिक वाढवला आहे. 12 ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत सुनिधी हलकारे आणि समृद्धी हलकारे यांनी पोहण्याच्या विविध स्पर्धांमध्ये एकूण पाच पदकांची कमाई केली. या दोघींनी मिळून 2 …

Read More »

बी. के. मॉडेल हायस्कूल शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ

  बेळगाव : शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणा-या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या ‘बी. के. मॉडेल हायस्कूल’ने आपल्या यशस्वी वाटचालीची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. शताब्दी महोत्सव सप्ताहा अंतर्गत आज शुक्रवारी सायंकाळी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हास्य कलाकारांच्या हास्यांच्या फवाऱ्यातून शताब्दी महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला. शताब्दी महोत्सव सप्ताहाच्या आजच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर …

Read More »

स्वतंत्र ओळख, अंतर्गत आरक्षणासाठी भटक्या समुदायांचे आंदोलन

  बेळगाव : अनुसूचित जाती संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भटक्या समुदाय अंतर्गत आरक्षण संघर्ष समिती बेंगलोरने कर्नाटकातील 59 भटक्या समुदायांना स्वतंत्र ओळख आणि अंतर्गत आरक्षणात 1 टक्का वाटप करावे, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. सदर मागणीच्या पूर्ततेसाठी अनुसूचित जाती संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भटक्या समुदाय अंतर्गत आरक्षण संघर्ष समितीतर्फे आज बेळगाव …

Read More »

क्रांतिकारी किसान सेनेचा बेळगावच्या सुवर्णसौधवर धडक मोर्चा

  बेळगाव : राज्यातील शेतकरी समुदायाने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी किसान सेनेच्या नेतृत्वाखाली सुवर्णविधानसौधसमोर भव्य निदर्शने केली. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत या वेळी सरकारला निवेदन सादर करण्यात आले. साखरेच्या दरात वाढ होऊनही शेतकऱ्यांच्या पदरी अपेक्षित नफा पडत नसल्याने, …

Read More »

मालवण येथील सागरी जलतरण स्पर्धेत मोहित राहुल काकतकर याला सुवर्णपदक; आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटू चमकले

  बेळगाव : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेने मालवण येथील चिवला बीच येथे सागरी जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे, मुंबई,कोल्हापूर,सातारा, कराड, इचलकरंजी, नाशिक, सोलापूर, गुजरात, बेळगाव, हुबळी, धारवाड, बेंगलोर, पंनजीम गोवा, येथील जवळजवळ एक हजार जलतरण पटूनी भाग घेतला होता. या स्पर्धेत …

Read More »

स्पर्धा गोकाकात तर निवड चाचणी म्हैसूरात; शरीर सौष्ठव पट्टू संभ्रमात!

  बेळगाव : 19 जानेवारी 2026 रोजी बारावी सतीश शुगर क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा जिल्हा आणि राज्य पातळीवर होणार आहे. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील आणि राज्यातील युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी, युवक जास्तीत जास्त प्रमाणात शरीर सौष्ठव स्पर्धेकडे वळावे यासाठी …

Read More »

१४ व्या कॅपिटल वन करंडकासाठी स्पर्धा रंगणार उद्यापासून; नाट्यरसिकांना नाट्यपर्वणी

  बेळगाव : सलग १४ वर्षी कॅपिटल वन करंडकासाठी स्पर्धा दोन दिवस रंगणार आहे. येथील कॅपिटल वन मल्टिपर्पज सोसायटी ही संस्था सातत्याने स्पर्धेचे आयोजन करीत आहे. स्पर्धेसाठी अनुभवी व मातबर अशा परीक्षकांना निमंत्रित करण्यात येते.. यंदाही प्रमोद काळे – पुणे, सुनिल खानोलकर – मुंबई, वामन पंडीत – सिंधुदुर्ग यांना निमंत्रीत …

Read More »

वैश्यवाणी समाजाच्या सचिवपदी विनायक शहापूरकर यांची निवड

  बेळगाव : श्री समादेवी मंगल कार्यालय येथे श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज बेळगाव या संस्थेची नवनियुक्त कार्यकारिणीची प्रथम बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष महादेव गावडे उपस्थित होते. अध्यक्षांनी समाजाच्या सचिव पदी विनायक शहापूरकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला विश्वस्त सुधीर मदली यांनी अनुमोदन दिले. व एक मताने त्यांची …

Read More »

मराठी विद्यानिकेतन शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव

  अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचा… बेळगाव : शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर व शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 या दोन दिवसात मराठी विद्यानिकेतन शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव असून क्रीडा महोत्सव उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्ट्रेन्थ स्टुडिओचे मालक संभाजी रमेश पावले व माया संभाजी पावले उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे क्रीडांगणामध्ये आगमन झाले. यानंतर …

Read More »