बेळगाव : १ जून १९८६ दिवशी बेळगाव येथे झालेल्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात शनिवार १ जून २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता श्रद्धांजली कार्यक्रम तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला आहे. या कार्यक्रमास शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी …
Read More »मातृभाषेतून शिक्षणामुळे विचारांचा पाया मजबूत होतो
साठे प्रबोधनी व्याख्यानमालेत प्रतापसिंह चव्हाण यांचे प्रतिपादन बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातृभाषेतून शिक्षण या विषयावरील व्याख्यान व गुणगौरव समारंभाचे आयोजन मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, प्रमुख वक्ते प्रतापसिंह चव्हाण, …
Read More »अर्जुन जाधव यांच्या “प्रेयसी एक आठवण..” साहित्यकृतीला राज्यस्तरीय पुरस्कार
बेळगाव : बेळगावचे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव लिखित “प्रेयसी एक आठवण ..” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला पलपब पब्लिकेशन संस्था, अहमदाबाद (गुजरात) या संस्थेचा “पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार 2024” हा उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद (गुजरात) ही संस्था गुजरात …
Read More »कावळेवाडी महात्मा गांधी संस्थेतर्फे कवी संमेलनाचे आयोजन
बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे एक जून रोजी सकाळी दहा वाजता बिजगर्णी हायस्कूलमध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलन उद्घाटन एस. एम. जाधव यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून ऍड नामदेव मोरे उपस्थित राहणार आहेत. फोटो पूजन आर. बी. देसाई यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन …
Read More »चन्नेवाडी शाळेला गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांची भेट
खानापूर : चन्नेवाडी येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बंद असलेल्या शाळेला सुरू करण्यासंदर्भात खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांना काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले होते, यासाठी मंगळवार दिनांक २८ मे रोजी श्रीमती कुडची यांनी सीआरपी …
Read More »हलगा-मच्छे बायपास विरोधातील स्थगिती उठवताच जेसीबी दाखल
बेळगाव : हलगा- मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांनी सुमारे दीड दशके चालविलेल्या लढ्याची धार शेतकऱ्यांतील फुटीमुळे कमी होताना दिसत आहे. या प्रकरणी काही शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा मोबदला घेतला आहे तसेच बायपास रस्त्याचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. नुकताच हलगा-मच्छे बायपास जमीन संपादन विरोधात शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील स्थगिती उठवताच ठेकेदाराने …
Read More »सामाजिक कार्यकर्ते विश्वास धुराजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त….
बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि समाज सुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृत महोत्सव आज बुधवार दि. २९ मे रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजिण्यात आला आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त निवृत्त प्राचार्या विनोदिनी मुरकुटे यांनी घेतलेला आढावा… श्री. विश्वास नारायण धुराजी आणि मी विनोदिनी …
Read More »बेकायदेशीरपणे देणग्या (डोनेशन) स्वीकारल्यास शाळांची नोंदणी रद्द : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा इशारा
बेळगाव : जिल्ह्यातील विनाअनुदानित किंवा अनुदानित शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारता येणार नाही. बेकायदेशीरपणे देणग्या घेतल्याचे आढळून आल्यास अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शाळांमध्ये देणगी (डोनेशन) घेतली जात असल्याच्या तक्रारी …
Read More »नियोजित वधूच्या आत्महत्येनंतर बेळगाव येथे तरुणाची आत्महत्या
बेळगाव : ज्या तरुणीसोबत लग्न करायचे होते तिच्या सोबतच लग्न ठरले आणि दोघांनीही सुखी संसाराची स्वप्ने रंगवली असतानाच नियतीने एक वेगळाच डाव मांडला. नियोजित वधूला कर्करोगाचे निदान झाल्याचे समजताच नियोजित वधूने उत्तर प्रदेश येथे आत्महत्या केली आणि विरह सहन न झाल्याने बेळगाव येथे तरुणाने आपले जीवन संपविले. नियोजित वधूला …
Read More »दहावीत जिल्ह्यात पहिली आलेल्या तनिष्का नावगेकरचा आदर्श को- ऑप. सोसायटीतर्फे सत्कार
बेळगाव : अनगोळ क्रॉस टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श मल्टीपर्पज को ऑप. सोसायटीचे कायदा सल्लागार ऍड. शंकर नावगेकर यांची कन्या व सेंट मेरीज हायस्कूलची विद्यार्थिनी तनिष्का शंकर नावगेकर हिने नुकत्याच झालेल्या दहावी बोर्डाच्या परिक्षेत जिल्ह्यात पहिली येण्याचा बहुमान मिळविला. याबद्दल तिचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन एस. एम. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta