सेंट्रल हायस्कूलमध्ये पालक मेळाव्यात मार्गदर्शन बेळगाव : मराठी माध्यमाची मुले मुळातच हुशार आहेत. त्यांना थोड मार्गदर्शन केले तर ती अव्वल गुण मिळवतील. पालकांना एक विनंती आहे स्वतःच्या मुलाची तुलना इतराशी करु नका. पै पाहुण्यासमोर तर त्याचा पाणउतारा करण्याऐवजी त्याचे कौतुक करा. बघा मग तुमच्या मुलांमध्ये कसे बदल घडतात, असे …
Read More »जैन मुनींची तुकडे तुकडे करून निर्दयी हत्या!; मृतदेह 30 फूट खोल बोअरवेलमध्ये आढळला!
चिक्कोडी : हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या मृतदेहाचे 9 भाग बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले आहेत. खून इतका निर्दयपणे करण्यात आला की मृतदेहाचे 9 भाग करण्यात आले आहेत. दोन हात, दोन पाय, मांडीचे दोन …
Read More »पावसाळ्यात स्मार्ट सिटीत चिखलाचे साम्राज्य
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघ – रुक्मिणी नगर स्मशानभूमी रस्ता पाहिलं तर बेळगावात स्मार्ट सिटी योजना कितपत यशस्वी झाली याचा अंदाज तुम्हीचं लाऊ शकता. महापालिका व्याप्ती मधील हे चित्र आहे स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगाव शहर उपनगरातील रस्ते चकाचक झाल्या असल्याचा दावा करण्यात आला असला तरी पहिल्या पावसातच उपनगरामध्ये …
Read More »एंजल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधक लस
बेळगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने आज सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधक लस देऊ केली आहे. येथील फुलबाग गल्ली मधील शाळा नंबर सात मध्ये विद्यार्थ्यांना डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या हस्ते …
Read More »जैन स्वामींजींच्या हत्येप्रकरणी : दोघा संशयितांना अटक
बेळगाव : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या हिरेकोडी आश्रमातील एका जैन साधूची हत्या करण्यात आली आहे. हिरेकोडी आश्रमाचे आचार्य कामकुमार नंदी महाराज गेल्या बुधवारी बेपत्ता झाले होते. रायबाग तालुक्यातील कटकबावी गावात महाराजांची हत्या झाल्याची पोलिसांना माहिती आहे. बेळगावचे एसपी संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी …
Read More »मंगाईदेवी यात्रेत भक्तांना अडथळा; मंदिर मार्गावर भिंत बांधल्याने नाराजी
बेळगाव : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवस्थान पासून मंगाईनगर पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. यामुळे मंगाईनगर येथील रहिवाशांना मंदिराकडे येण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर वळसा घालून यावे लागत आहे. यामुळे गैरसोय होत असून रहिवाशांना मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी मंगाई नगर रहिवाशी संघाने केली आहे. वडगावची …
Read More »हिरेकुडी येथील बेपत्ता जैन मुनीचा संशयास्पद मृत्यू
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह शुक्रवारी रात्री संशयास्पदरित्या आढळला आहे. चिकोडी हिरेकुडीमधून जैन मुनी बेपत्ता झाल्याची तक्रार चिकोडी पोलिसात नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा या जैन मुनींचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला असून त्यांच्या शरीरावर जखमा …
Read More »वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस चौकीचे काम
बेळगाव : छत्रपती धर्मवीर संभाजीराजे परिसरातील पोलीस चौकीचे काम एक दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. यासंदर्भात खडेबाजार एसीपी अरुणकुमार कोळूर यांना मराठा समाजाचे नेते किरण जाधव व छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कॅम्प येथील एसीपी …
Read More »राज्याचा अर्थसंकल्प दिशाहीन : डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली. सिद्धरामय्या म्हणाले की, आमचा मंत्र ‘सर्वांसाठी समान वाटा, सर्वांना समान अधिकार’ आहे. विकास आणि सामाजिक न्यायासाठी अर्थसंकल्प मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. हे हास्यास्पद आहे. …
Read More »सराफ गल्ली श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक तसेच स्थापना व अभिषेक कार्यक्रम भक्तिभावाने साजरा
बेळगाव : सराफ गल्ली, शहापूर येथील मराठा पंच कमिटीतर्फे आयोजित श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक तसेच स्थापना व अभिषेक कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी मोठ्या भक्तिभावाने पार पडला. सराफ गल्ली कोपऱ्यापासून काल सायंकाळी श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीमध्ये मराठा पंच कमिटीचे सदस्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta