Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगाव

दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर झाड कोसळल्याने युवक जागीच ठार

  बेळगाव : दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर झाड कोसळून युवक जागीच ठार झाल्याची घटना आरटीओ सर्कल पाच नंबर शाळेसमोर मंगळवारी सकाळी घडली आहे. राकेश सुलधाळ (वय 26) रा.सिद्धनहळळी बेळगाव असे या घटनेत ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी आहे की, सदर युवक दुचाकीवरून आरटीओकडून कोर्टकडे जात होता. …

Read More »

साईज्योती सेवा संघाच्या सहकार्यामुळे महिला सुखरूप घरी पोहोचविण्यास मदत

  बेळगाव (वार्ता) : साईज्योती सेवा संघाच्या सहकार्यामुळे निपाणी येथील संतुलन बिघडलेली एक महिला सुखरूप आपल्या घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की, काल रात्री सुमारे 8.30 वाजता राणे साखरवाडी निपाणी येथील कमलाबाई शिंदे नामक आजी टिळकवाडी दुसरा रेल्वे गेट जवळ आढळून आल्या असता साईज्योती सेवा संघाच्या …

Read More »

उद्यमबाग पोलिसांकडून दुचाकी चोराला अटक; तीन दुचाकी जप्त

  बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. विशाल महादेव मक्कळगेरी (२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपींकडून चोरलेल्या एक हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो होंडा स्प्लेंडर आणि बजाज सिटी 100 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उद्यमबाग पोलिस स्थानकाचे निरीक्षक रामण्णा …

Read More »

पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसाचा जोर

  बेळगाव जिल्ह्यातील 17 पूल पाण्याखाली : 35 घरे कोसळली बेळगाव (प्रतिनिधी) : सीमाभागातील बेळगाव जिल्हा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. परिणामी बेळगाव तालुका, शहर परिसर आणि जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार सुरूअसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 17 पूल पाण्याखाली गेले असून 36 …

Read More »

संगीत शिक्षिका निवेदिता नवलगुंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बेळगाव : निवेदार्पण अकादमी ऑफ म्युझिकच्या संचालिका निवेदिता नवलगुंद यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 49 वर्षांच्या होत्या. सोमवारी पहाटे 1.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही. बेळगावातील चन्नम्मा नगर येथे गेल्या काही वर्षांपासून त्या संगीत अकादमी चालवत होत्या. …

Read More »

भारत नगर, शहापूर येथील इमारतीचा जीर्ण भाग कोसळला

  बेळगाव : भारत नगर, शहापूर येथील बाजार रोड (मुख्य रस्ता) वरील धोकादायक अवस्थेत असलेल्या कदम चाळेचा उत्तरेकडील भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, जीर्ण इमारतीचा कोसळलेला भाग नजिकच्या अनिल पाटील त्यांच्या घरावर पडून घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. शिवाय पान टपरीचेही पत्रे फुटून नुकसान झाले. पाटील कुटुंबातील महेश …

Read More »

हुलीकट्टी येथे भिंत कोसळून महिला ठार

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात घडली. हुलीकट्टी गावातील गंगव्वा रामण्णा मुलीमनी यांचा जोरदार पावसामुळे घर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. आज, रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली. यावेळी घरात झोपलेल्या गंगव्वा गंभीर जखमी झाल्या. …

Read More »

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणाची हत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुगळीहाळ येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला आहे. अर्जुन गौड (21) असे चाकूने वार केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात हाणामारी झाली, यादरम्यान एका व्यक्तीने अर्जुन गौड याच्या छातीत वार करण्यात आले …

Read More »

हुतात्मा चौक गणेश उत्सव मंडळ व प्राईड सहेली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर….

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक व प्राईस सहेली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ हुतात्मा चौक येथे उत्साहात पार पडला. व्यासपीठावर हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार, सेक्रेटरी शिवाजी हंडे, प्राईड सहेलीच्या अध्यक्ष आरती शहा होत्या. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सेक्रेटरी शिवाजी …

Read More »

बेळगावात भक्तिभावाने गणरायाला निरोप!

बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी प्रेमाची साद घालत शुक्रवारी समस्त बेळगावकरांनी शुक्रवारी घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तींचे शहरातील विहिरी, विसर्जन तलाव आणि पालिकेने पुरवलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर, यंदा बेळगावचा गणेशोत्सव जोरदार जल्लोषात साजरा झाला. 10 …

Read More »