Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव

मराठा समाजाच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा : आ. श्रीमंत पाटील

  बेळगाव : मराठा समाजाचा 3 बी प्रवर्गातून 2ए प्रवर्गात समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एक-दोन दिवसात याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली. सुवर्णसौधमधील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बुधवारी एका खासगी हॉटेलात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद

  बेळगाव : बैतूनी इटारसी मध्य प्रदेश येथील भारत भारतीय आवास विद्यालय शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या 33व्या विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने विजेतेपद पटकाविले. प्राथमिक गटातील मुलींच्या पहिल्या सामन्यात संत मीरा शाळेने मध्यक्षेत्राचा 5-3 असा पराभव केला विजयी संघाच्या समीक्षा …

Read More »

मराठा मंडळाच्या सहाना आणि भूमिका यांना ज्यूडोमध्ये युनिव्हर्सिटी ब्लू

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात शिकणाऱ्या बी.कॉम. प्रथम वर्षाची सहाना एस. सार. आणि बी.ए. प्रथम वर्षाची भूमिका व्ही.एन. विद्यार्थिना ज्यूडोमध्ये विशिष्ट कामगिरी केल्याबद्दल राणी चन्नम्मा विद्यापीठाचा ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ हा मानाचा किताब बहाल करण्यात आला आहे. सहाना एस. सार. हिने शिमोगा येथे आयोजित …

Read More »

सकल मराठा समाजाचे भव्य आंदोलन

  बेळगाव : राज्यभरातील मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी २ ए मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आज अधिवेशनादरम्यान बेळगावमधील कोंडसकोप्प येथे भव्य आंदोलन छेडण्यात आले. अनेक वर्षांपासून ह्या आरक्षणाची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी बंगळूरच्या गवीपूर मठाचे मंजुनाथ स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनाला हजारोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय उपस्थित होता. अनेक …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक उद्या

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकारी व सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर यांनी केले आहे

Read More »

रक्तदान हे मोठे पुण्याईचे काम

  डॉ. संतोष देसाई, मराठा संस्कृतीच्या रक्तदान शिबीरास प्रतिसाद बेळगाव : माणसाने पुण्य प्राप्त करण्यासाठी काशी, रामेश्वरला जाण्याची गरज नाही. रक्तदान हे महादान आहे. यासाठी रक्तदान करणारी व्यक्तीच खरे पुण्य प्राप्त करते, असे प्रतिपादन डॉ. संतोष बी. देसाई यांनी केले. येथील मराठा संस्कृती संवर्धन संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात …

Read More »

दिवंगतांना श्रद्धांजली, पहिल्या दिवसाचे काम आटोपते, सभागृहात थोर पुरुषांच्या तैलचित्रांचे अनावरण

  बेळगाव : येथील सुवर्णसौध विधानसभेत आज सोमवार पासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगतांना श्रद्धांजली वाहून काम आटोपते घेण्यात आले. त्याचबरोबर आजच्या पहिल्या दिवशी सभागृहात बसवेश्वर, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य …

Read More »

समितीच्या महिला कार्यकर्त्याही पोलिसांच्या ताब्यात

  बेळगाव : महामेळाव्यात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व माजी महापौर सरीता पाटील, शिवानी पाटील, कल्पना सूतार, रुपा नागवेकर महिला पोलिस ठाण्यात कॅम्प येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे

Read More »

कर्नाटक शासनाची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही

  माजी मंत्री हसन मुश्रीफ : कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मविआ आघाडीचा मोर्चा कोगनोळी : कर्नाटक शासनाने मराठी भाषिकांच्यावर अन्याय केला आहे. बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना अडवणे हे कर्नाटकचे धोरण लोकशाही विरोधी आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सुप्रीम …

Read More »

मराठी भाषिकांवर पोलिसांची दादागिरी : समिती नेते अटकेत

  महाराष्ट्रातील पत्रकारांवरही दबावतंत्र बेळगाव : कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला शेवटच्या क्षणी पोलिसांनी परवानगी नाकारून दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. आज सकाळपासून या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले असून व्हॅक्सिन डेपो येथे उभारण्यात आलेला मंडप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले …

Read More »