Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

पोलीस आयुक्तालय प्रवेशद्वारावर साप

बेळगाव : शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेश दारावरील पाईपमध्ये भला मोठा साप शिरल्याने उपस्थित पोलिसांची एकच तारांबळ उडाल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली. मात्र सर्पमित्र आनंद चिट्ठी यांनी त्या सापाला शिताफीने पकडल्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबाबतची माहिती अशी की, आज बुधवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील पाईपमध्ये एक साप शिरला …

Read More »

बामणवाडी रस्त्याबाबत ‘शांताई’चे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : जांबोटी रोड कॉर्नर ते बामणवाडी पर्यंतच्या शांताई वृद्धाश्रमाला जवळून जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप बसवण्याबरोबरच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, जेणेकरून आश्रमातील वृद्धांची चांगली सोय होऊ शकेल, अशी मागणी शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष विजय मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन …

Read More »

अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडी रहिवाशांना दिलासा

आमदारांनी संबंधित विषयी केली धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आनंदवाडीतील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदारांनी संबंधित विषयी धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. वक्फ बोर्डाने आनंदवाडी येथील रहिवाशांच्या राहत्या जागा ताब्यात घेण्यासाठी खटाटोप चालविला आहे. यामुळे …

Read More »

टिप्परखाली सापडून ब्रम्हनगरचा युवक ठार

पहिल्या रेल्वे फाटकाजवळ घडली ही घटना बेळगाव : भरधाव टिप्परखाली सापडून ब्रम्हनगर (बेळगाव)चा 35 वर्षीय इसम जागीच ठार झाला. विजय परशुराम नाईक असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ आज बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. विजय परशुराम नाईक हा आपल्या दुचाकीने चालला असता …

Read More »

विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची सदिच्छा भेट

बेळगाव : बेळगावमधील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. रवी पाटील यांच्या विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरमध्ये गोवा भाजप उत्तर विभाग अध्यक्ष सध्या उपचार घेत असून यांच्या तब्येतीची विचारपूस करून डॉ. रवी पाटील आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांनी भेट घेतली. …

Read More »

अनुसूचित जाती-जमाती अन्याय निवारणासाठी जिल्हा जागृती समितीची बैठक संपन्न

बेळगाव : अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांवर झालेल्या अन्यायावरील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकालात काढण्यात येतील, तसेच त्यांना न्याय देण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या जिल्हा जागृती आणि प्रभारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

“बेळगाव श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेला प्रारंभ

बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने, संजय सुंठकर एस. एस. एस. स्पोर्ट्स फौंडेशन कणबर्गी पुरस्कृत 56 व्या जिल्हास्तरीय बेळगाव श्री 2022 शरीरसौष्ठव स्पर्धेला मराठा मंदिराच्या सभागृहात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा, संजय सुंठकर, बाळासाहेब काकतकर, नीना काकतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून …

Read More »

हिंडलगा रस्त्याच्या कामासाठी मंत्री ईश्वरप्पांनी मागितले कमिशन

कंत्राटदाराची तक्रार; ईश्वरप्पा यांनी दाखल केला मानहानीचा दावा बंगळूर : ग्रामीण विकास आणि पंचायत राज (आरडीपीआर) मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना बेळगाव येथील संतोष के. पाटील यांनी लावलेल्या किकबॅकच्या आरोपासंदर्भात क्लीन चिट देण्यात आल्याचे दिसते. बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील रस्त्याच्या कामाचे चार कोटीचे बिल देण्यासाठी ईश्वरप्पा यांच्या सहाय्यक सचिवानी कमिशन …

Read More »

शांताई वृद्धाश्रमातर्फे आमदार अनिल बेनके यांचा सत्कार

बेळगाव : बेळगावच्या बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलचा कायापालट करून सर्वसामान्य जनतेला पूरक अशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शांताई वृद्धाश्रमातर्फे आज मंगळवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. शांताई वृद्धाश्रमांमध्ये माजी महापौर विजय मोरे यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन आमदार बेनके यांचा गौरव केला. खाजगी …

Read More »

देसुरच्या प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन उत्साहात

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देसुर गावामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप एसी मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य पृथ्वी सिंग, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे संचालक जस्विर सिंग उपस्थित होते. प्रारंभी मंदिर कमिटीच्यावतीने पाहुण्यांचा शाल …

Read More »