बेळगाव : विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे, असे मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केले आहे. हुक्केरी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. बेळगाव जिल्हा अठरा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे. हा जिल्हा राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांमध्ये गणला जात असून जिल्ह्याचा विकास खास गुंतला आहे. …
Read More »ग्रामीण आमदारांकडून जखमी गवंडी कामगाराची विचारपूस
बेळगाव : कोळीकोप येथील गवंडी कामगार बाळु फकीरा नाईक हे कामावर असताना स्लॅब घालतेवेळी काँक्रीट मशीनवरून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. यावेळी त्यांचा हात, पाय आणि कंबर मोडल्याने त्यांना उपचाराकरिता विजया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी बाळू नाईक यांच्यावर जवळपास महिनाभर उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेची माहिती समजल्यावर …
Read More »बेळगावच्या आयटी पार्क संदर्भात खास. कडाडी यांची केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत चर्चा
बेळगाव : खासदार इराण्णा कडाडी यांनी आज सोमवारी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खास. कडाडी यांनी बेळगावमधील नियोजित आयटी पार्कच्या जागेबाबत राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा केली. बेळगावच्या आयटी पार्क संदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याची विनंती यावेळी खास. कडाडी यांनी केली. यावेळी …
Read More »भास्कर राव यांचा आम आदमी पक्षात प्रवेश!
बेंगळुरू : दिल्ली, पंजाब विधानसभेची निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर आम आदमी पार्टीनं आपला मोर्चा आता गुजरात, कर्नाटकाकडं वळवलाय. गुजरात आणि कर्नाटक विधानसभेची निवडणूक 2023 मध्ये होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आप पक्षात प्रवेश केलाय. …
Read More »शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ हरपले!
कै. शंकरराव पाटील यांना विविध संघटनांच्यावतीने श्रद्धांजली बेळगाव : ‘शंकरराव पाटील यांच्या निधनाने बेळगावातल्या एका दानशूर व्यक्तीचा अंत झाला आहे. त्यांच्या निधनामुळे अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ हरपले आहे’ , असे विचार अनेक मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले. मराठा कॉलनी येथील रहिवाशी, मार्केट यार्डमधील अडत व्यापारी आणि मराठा मंडळ शिक्षण …
Read More »लवकरच युवा सेनेचा सीमाभागात विस्तार : सरदेसाई
बेळगाव : बेळगाव सीमाभागामध्ये शिवसेना कार्यरत आहे. आता लवकरच युवा सेनेचा बेळगाव सीमाभागात विस्तार केला जाईल, असे आश्वासन शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव अरुण सरदेसाई यांनी दिले. बेळगाव शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सांबरा विमानतळावर युवा सेनेचे सचिव अरुण सरदेसाई स्वागत करून भेट घेतली असता त्यांनी हे आश्वासन दिले. कोल्हापूर दौऱ्यावर निघाले असता त्यांनी …
Read More »ग्रामीण रस्त्यांबाबत तालुका समितीच्या नेत्यांनी घेतली बांधकाम खात्याच्या अधिकार्यांची भेट
बेळगाव : ग्रामीण भागातील खराब रस्त्यांसंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांची भेट घेतली. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ॲड. सुधीर चव्हाण आदींनी आज सोमवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी समिती नेत्यांनी …
Read More »पायोनियर बँकेला १.२१ कोटीचा नफा : एनपीए ०.३५ टक्के
बेळगाव : येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी २१ लाख ५६ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून बँकेकडे १०५ कोटी ६७ लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. तर एन. पी. ए. चे प्रमाण ०.३५ टक्क्यावर आले आहे. अनेक कारणामुळे सर्वत्र आर्थिक घडी विस्कटली असली तरीही बँकेने …
Read More »धामणे येथे बैलगाडा पळविण्याची शर्यत उत्साहात
बेळगाव : धामणे (ता. जि. बेळगाव) येथील श्री कलमेश्वर शेतकरी संघटना व तरुण युवक मंडळ यांच्यातर्फे खास बसवेश्वर यात्रेनिमित्त आयोजित रिकामा गाडा बैलगाडीने पळविण्याची जंगी शर्यत नुकतीच उत्साहात पार पडली. धामणे येथे आयोजित सदर रिकामा गाडा बैलगाडीने पळविण्याच्या शर्यतीचा उद्घाटन समारंभ काल रविवारी गावातील प्रतिष्ठित नागरिक कुमाण्णा कोमाण्णाचे यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »मराठा एकता एक संघटनेची मासिक बैठक उत्साहात संपन्न
बेळगाव : रविवार दिनांक 03/04 2022 रोजी श्री शिवतीर्थ श्रीक्षेत्र राकस्कोप या ठिकाणी मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेची मासिक बैठक अगदी मोठ्या स्फूर्तीने संपन्न झाली. या मासिक बैठकीची सुरवात श्री शिवशंकर मंदिराची पूजा अर्चा करून आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती श्री धर्मवीर शंभूराजे, भगवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta