Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव

सनशाइन प्री स्कूलच्या समर कॅम्पला उत्साहात प्रारंभ

बेळगाव : कचेरी गल्ली शहापूर येथील सनशाइन प्री स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पला आज सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. दोन ते 5 वर्षापर्यंतच्या मुला-मुलींबरोबरच इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पमध्ये, सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डान्स, कुकिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, फिजिकल फिटनेस, गेम्स अँड ऍक्टिव्हिटी, क्राफ्ट, स्विमिंग, …

Read More »

वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या वारसांना एस. एस. फाऊंडेशनची मदत

बेळगाव : अकाली निधन पावलेले वृत्तपत्र छायाचित्रकार दिवंगत चेतन कुलकर्णी आणि परशराम गुंजीकर यांच्या कुटुंबाला एस. एस. फाऊंडेशनतर्फे मदत वितरित करण्यात आली. तसेच मुरगोडचे आजारी पत्रकार महांतेश बाळीकाई यांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांनाही मदत देण्यात आली. कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांनी …

Read More »

प्रोत्साह फाऊंडेशनच्या वतीने समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन

बेळगाव : बेळगावातील प्रोत्साह फाऊंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता महांतेश नगर येथील महंत भवनात समगार (चर्मकार) समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन स्नेहल रायमाने (आय. ए. एस.) करणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कलबुर्गी ग्रामीणचे आमदार बसवराज मत्तीगुड उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर या …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळची पूर्वतयारीची सभा

बेळगाव: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पूर्वतयारीची सभा घेण्यात आली या सभेला दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावात रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत आंबेडकर उद्यानात झालेल्या सभेत चर्चा करण्यात आली. 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता अशोक सर्कल येथून …

Read More »

कुख्यात डॉन बनंजे राजासह चौघांना जन्मठेप

बेळगाव कोका न्यायालयाचा निर्णय बेळगाव : कुख्यात डॉन बनंजे राजा याला अंकोल्याचे उद्योजक अन भाजप नेते आर. एन. नायक यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेळगाव येथील कोका न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली. ३ कोटी रुपयांची सुपारी घेऊन उद्योजक आर. एन. नायक यांची २१ डिसेंबर २०१३ रोजी हत्या करण्यात …

Read More »

धावत्या कारने घेतला अचानक पेट

बेळगाव : धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रसंग आज चन्नम्मा सर्कल जवळील संगोळी रायान्ना मार्गावर घडला. यावेळी अचानक कारमधून धूर निघाल्याने रस्त्यावर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी मोठा अनर्थ घडू नये याकरिता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सदर घटना आज सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली …

Read More »

मराठा समाजात विवाह वेळेवर होण्याबाबत प्राधान्य द्यावे : प्रकाश मरगाळे

बेळगांव : मराठा समाजात आता विवाह वेळेवर होण्याबरोबर इच्छूक मुलींनीही नोकरीवाल्याबरोबर व्यावसायिक मुलांना प्राधान्य द्यावे, असे मत अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. गोवावेस येथील मराठा मंदिर येथे मराठा समाज सुधारणा मंडळ आयोजित वधू-वर सूचक मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी मंडळाचे हितचिंतक शंकरराव पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. …

Read More »

समर्थ नगर येथील श्री दुर्गाशक्ती महिला मंडळाकडून नववर्षाचे उत्साहात स्वागत

बेळगाव : समर्थ नगर येथील एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर यांच्यावतीने लहान मुला-मुलींसाठी पारंपारिक वेशभूषा करून ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्न मंजुषा, तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी समर्थ नगरमधील ज्येष्ठ नागरिक …

Read More »

नावगे येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लब नावगे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, आज-काल मोबाईल युगामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा गावपातळीवर तरुणांनी …

Read More »

काकडे फौंडेशनतर्फे रांगोळी आर्टिस्ट अजित औरवाडकरांचा सत्कार

बेळगाव : आझादी का अमृतमहोत्सव आणि काकडे फौंडेशनच्या सातव्या वर्धापनानिमित्त गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बेळगावातील सुप्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट श्री. अजित महादेव औरवाडकरांचा सत्कार करण्यात आला. रांगोळी या हिंदुस्थानच्या पारंपरिक कलेच्या माध्यमातून विविध कलाकृती रेखाटणारे अजित औरवाडकरजी सर्वांना परीचीत आहेत.काकडे फौंडेशनच्यावतीने सौ. उज्वला काकडे, किशोर काकडे यांनी शाल-भेटवस्तू-पुष्प, सत्कारमुर्तिंचे छायाचित्र असलेले स्मृती पर्ण, …

Read More »