अध्यक्ष पदी अशोक चिंडक तर सेक्रेटरीपदी संजय झंवर यांची निवड बेळगाव : शहापूर येथील श्री व्यापारी मित्र मंडळाच्या श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्यावतीने यंदा कोरोना नियमावलीचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गणेशोत्सवासंदर्भात चर्चाविमर्ष करण्यासाठी रविवार दि.1 ऑगस्ट रोजी मंडळाच्या सभासदांची बैठक बोलविण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी …
Read More »वाहतूक समस्येचे निवारण करावे : सिटीझन कौन्सिलचे निवेदन सादर
बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आदी समस्यांसंदर्भात सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे आज वाहतूक व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांना निवेदन सादर करून संबंधित समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी करण्यात आली. सिटिझन्स कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवारी सकाळी …
Read More »गावागावात, शाखे-शाखेत पोहोचवणार सीमाप्रश्नाचे पुस्तक : युवा सेनेचे निर्धार
बेळगाव (वार्ता) : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे लिखित सीमालढ्यावर आधारित ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाला बेळगावसह सीमाभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुस्तक प्रकाशनापूर्वीच वातावरण निर्मिती झाली आहे. हे पुस्तक प्रत्येक गावागावात शाखे -शाखेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार युवा सेना बेळगावच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. ‘संघर्ष महाराष्ट्रात …
Read More »सीमाप्रश्नी पत्रांची मोहीम यशस्वी करू
म. ए. समितीच्या महिला आघाडीचा जाहीर पाठिंबा बेळगाव (वार्ता) : खानापूर म. ए. युवा समितीने सीमाप्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन तो सोडवावा या मागणीसाठी सीमाभागातून 11 लाख पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याची जी मोहीम हाती घेतली आहे त्या मोहिमेला म. ए. समितीच्या रणरागिनी, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, महिला आघाडीच्या …
Read More »पाण्यातून वाहून जाणाऱ्या इसमाचा जीव वाचविणाऱ्या श्री. कार्लेकर आणि सहकाऱ्यांचा किरण जाधव यांनी केला सन्मान
बेळगाव (वार्ता) : वाहत्या पाण्यात बुडणाऱ्या इसमाचे प्राण वाचविणाऱ्या ऍनिमल फिडर्स ग्रुपचे सदस्य श्री. कार्लेकर यांचा विमल फौंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप युवा नेते किरण जाधव यांचा शाल-पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते. शेती शिवारे तुडुंब भरली होती. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत 23 …
Read More »आनंद नगर वडगाव येथे 215 जणांचे लसीकरण
बेळगाव (वार्ता) : आनंद नगर वडगाव येथे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून व आनंद नगर रहिवासी संघटनेच्या सहकार्यातून कोविशील्ड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस सुमारे दोनशे पंधरा जणांना देण्यात आला. सोमवार (ता. 2) रोजी आनंद नगर वडगाव येथील शिव मंदिरामध्ये हे लसीकरण पार पडले. प्रारंभी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आनंद नगर …
Read More »वडगाव येथे प्राणघातक हल्ल्यात एकाचा खून
बेळगाव (वार्ता) : आज सोमवारी दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान वडगाव-येळ्ळूर वेस बसस्थानकाजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी एकावर प्राणघातक हल्ला करून धारदार हत्याराने गळा चिरून खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.महादेव जाधव वय अंदाजे 55 रा. भारतनगर, वडगांव असे मयत इसमाचे नाव आहे.पोलिसांनी …
Read More »पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१० कोटी मंजूर : मुख्यमंत्री बोम्माई
घरांच्या नुकसानीची भरपाई जाहीर बंगळूर (वार्ता) : अतिवृष्टी आणि पूरामुळे राज्यातील १३ जिल्हे प्रभावित झाले असून तेथील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ५१० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी रविवारी बंगळुरमध्ये बोलताना दिली.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे सुरू …
Read More »सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापुर युवा समितीचा उपक्रम कौतुकास्पद : दीपक दळवी
बेळगाव : सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे राबविण्यात येणारा उपक्रम अतिशय चांगला आहे यामध्ये अनेकांनी सहभाग घेऊन पंतप्रधान कार्यालयाशी पत्र व्यवहार करावा असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले आहे.खानापूर तालुका युवा समितीतर्फे ऑगस्ट क्रांती दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अकरा …
Read More »स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे विविध कार्यक्रम साजरे
बेळगाव (वार्ता) : एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, या दिवसाचे औचित्य साधून बेळगाव जिल्हा स्वातंत्र सैनिक आणि उत्तराधिकारी संघाच्यावतीने वृक्षारोपण, सीसीटीव्ही कॅमेरा उद्घाटन, टिळक पुण्यतिथी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शतायुषी राजेंद्र कलघटगी हे होते तर पाहुणे म्हणून बेळगावचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta