Friday , November 6 2026
Breaking News

आजरा

मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस कोल्हापुरात आमने-सामने

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी कोल्हापूर शहरातील शाहुपूरी भागात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस आमने- सामने आले. याची जोरदार चर्चा रंगली आहे.मुख्यमंत्री …

Read More »

नुकसानीचा आढावा घेऊन मदत देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

शिरोळ येथील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच शेती, व्यापार आणि कौटुंबिक साहित्याच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथे पूर परिस्थिती पाहणी प्रसंगी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथील …

Read More »

जिगरबाज हर्षदमुळे महापुरातही नेसरी परिसरात विजपुरठा सुरळीत : उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महापुराच्या या नैसर्गिक आपत्तीत महावितरणने अहोरात्र काम केले आहे. नेसरी महावितरणचा कर्मचारी हर्षद विजय सुदर्शने याने जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन नेसरी परिसरातील १२ गावांचा विजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे जिगरबाज हर्षदसह नेसरी महावितरणचे कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचे मनोगत गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश …

Read More »

वाह रें पठ्या ….. पुरावर स्वार होऊन केला १३ गावांचा विजपुरवठा सुरळीत

नेसरी येथील हर्षची कामगिरी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी परिसरात महापूर म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. यावेळी तर घटप्रभा नदिने पुराचा विक्रम केल्याने परिसरातील अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता. पण नेसरी ता. गडहिंग्लज विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सेवेचे ठायी तत्पर…विजवितरण म्हणत महापुरातही धाडस दाखवत पुरातून पोहत …

Read More »

‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’

कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …

Read More »

कालकुंद्रीच्या विलास पाटील यांची कोकण विभागीय आयुक्तपदी निवड

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कालकुंद्री (ता.चंदगड) येथील विलास बाळाराम पाटील यांची कोकण विभागाच्या आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी कार्यरत आहेत. विलास पाटील यांच्या विभागीय आयुक्त म्हणून चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. कालकुंद्री येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत त्यांचे …

Read More »

नूतन जिल्हाधिकार्‍यांनी स्विकारला पदभार

कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून आज सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. श्री. रेखावार यांनी ऑगस्ट 2012 ते ऑगस्ट 2013 या काळात सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. गडचिरोली येथील इटापल्ली येथे ऑगस्ट 2013 ते फेब्रुवारी 2014मध्ये …

Read More »

चंदगड तालुक्याची वृक्षसंपदा दिवसेंदिवस धोक्यात…

(बांधकाम विभागावर ताशेरे : वृक्षसंपदा जगवणे ही काळाची गरज) चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याची खरी ओळख असणारी येथील वृक्षसंपदा ही दिवसेंदिवस नामशेष होताना दिसत आहे. चंदगड हद्दीतील भले मोठे वृक्ष तोडण्याचा सपाटा गेल्या वर्षापासून सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील चंदगड हद्दीच्या शिनोळी ते सिंधुदुर्ग जिल्हा …

Read More »

कोल्हापूर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत शिंपी यांची उपाध्यक्षपदी आज (सोमवार) बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीला यश आले. भाजपाने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती; मात्र ऐनवेळी माघार घेतली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे या निवडणुकीची उत्सुकता …

Read More »