Monday , April 20 2026
Breaking News

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रासह सीमाभागातील युवकांना सुवर्ण संधी

Spread the love

 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील तसेच सीमाभागातील युवकांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

१. संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना केलेली आहे. जून २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

२. पात्रता:- (अ) अविवाहित (मुलगा). (ब) महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगाव अणि कारवार जिल्ह्याचे अधिवासी. (क) जन्म तारीख ०२ जानेवारी २००८ ते ०१ जानेवारी २०११ च्या दरम्यान. (ड) मार्च / एप्रिल / मे २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा. (इ) जून-२०२५ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

३. शारीरिक पात्रताः- सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषांस पात्र असावा. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष पुढीलप्रमाणेः- उंची कमीत कमी १५७ सें.मी. वजन-४३ कि. ग्रा. रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसावा. छाती न फुगवता-७४ से.मी. फुगवून-७९ से.मी. NDA / INA प्रवेशासाठी UPSC च्या आधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी.

४. लेखी परीक्षा आणि मुलाखत :- पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून २० एप्रिल २०२५ रोजी विविध केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत ६०० मार्काचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ प्रश्न गणिताचे आणि ७५ प्रश्न सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असे एकूण १५० प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला (४) गुण व चुकीच्या उत्तरास (-१) गुण मिळतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

५. ऑनलाईन अर्ज www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क रूपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकींग इत्यादी व्दारे भरावे, डिमांड ड्राफ्ट किंवा चलानव्दारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.

६. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यत.

७. हॉल तिकीटः- दिनांक १० एप्रिल २०२५ सकाळी १०:०० वा. नंतर संस्थेच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

८. परीक्षा संबंधीत सूचनांसाठी www.spiaurangabad.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही याबाबत सूचना दिल्या जाणार नाहीत.

SPI Sambhaji Nagar/Aurangabad या नावाने net वर बघितले तर त्या संस्थेची माहिती मिळेल. ही संस्था महाराष्ट्र शासनाची असून महाराष्ट्र राज्य व सीमा भागातील 10 वी नंतरच्या मुलांना भारतीय संरक्षण दलात (military) अधिकारी होण्यासाठी 11 वी मध्ये प्रवेश देऊन त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रवेश, राहण्याची सोय सर्व विनामूल्य आहे, याचीयुवकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

ओम्नी प्रवासी गाडी आणि मिक्सर यांच्यात भीषण टक्कर; 11 जणांचा जागीच मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलीही दगावल्या!

Spread the love  मुंबई : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी सुमारे 11 …

One comment

  1. माणूसकिच्या दृष्टीने आणि न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय योग्य कि अयोग्य ठरवावा.
    न्यायव्यवेस्था जीवंत आसल्याचे हे मानदंड ठरेल.

Leave a Reply to sangeeta Ajarekar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *