Friday , October 23 2026
Breaking News

योग्य दर जाहीर केल्याशिवाय कांडेही तोडू देणार नाही

Spread the love

 

रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार ; हत्तरगी टोलनाक्यावर संघटनेचे आंदोलन

निपाणी (वार्ता) : रासायनिक खत आणि औषधांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामानाने यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये दर मिळावा. याशिवाय
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी विविध संघटनांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी टोलनाक्याजवळ रास्ता रोको करुन आंदोलन छेडले. त्यामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी सरकारच्या विरोधात विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांना कर्नाटक राज्य रयत संघटनेने ऊस दराबाबत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे टोलनाक्यावर सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक थांबून होती. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, आतापर्यंत ऊसाला योग्य दर मिळण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रस्त्यावर बसून आंदोलन केले आहे. सध्या पाण्याअभावी ऊस वाळत असून उत्पादनात घट होणार आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडणार आहे. ऊसाला योग्य दर जाहीर केल्याशिवाय कांडेही तोडू देणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही कारखान्यांच्या भूलथापांना बळी न पडता ऊस तोड देऊ नये. कर्नाटक राज्य रजत संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी असून ऊस दरासाठी होणाऱ्या सर्वच आंदोलनात ऊस उत्पादक शेतकऱ्यासह शेतकरी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे.
यापुढील काळात सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तात्काळ ऊस दराचा तोडगा काढण्याची मागणी केली. संघटनेचे अध्यक्ष चनाप्पा पुजारी यांनीही शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी चिक्कोडी तालुका रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *