Friday , October 23 2026
Breaking News

निपाणी बागेवाडी महाविद्यालयात गुरुवारपासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या राज्यस्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ‘लॉन टेनिस स्पर्धेचे’ गुरुवारी (ता.१४)सकाळी १० वाजता येथील के.एल.ई. संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महा विद्यालयाच्या प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बंगळुर येथील पदवीपूर्व शालेय शिक्षण विभाग, चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा उपसंचालक शालेय शिक्षण विभाग पदवीपूर्व महाविद्यालयीन प्राचार्य आणि व्याख्याता संघ, कर्मचारी संघ आणि शारीरिक शिक्षण व्याख्याता संघ, शैक्षणिक जिल्हा चिक्कोडी आणि के.एल.ई. संस्थेच्या जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरची राज्यस्तरीय स्पर्धा गुरुवारी (ता. १५) आणि शुक्रवारी (ता.१६) अशा दोन दिवसांच्या कालावधीत होणार आहेत. विविध जिल्ह्यांतून सहभागी होण्यासाठी येणाऱ्या मुले-मुलींच्या संघांना महाविद्यालयात नाव नोंदणी करता येणार आहे.
गुरुवारी (ता. १५) सकाळी १० वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामध्ये खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन शैक्षणिक जिल्हा चिकोडीचे उपसंचालक लिंगराजू एन. आणि के.एल.ई. संस्थेच्या जी.आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या प्राचार्या हेमा चिक्कमठ यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *