Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

गरीब विद्यार्थ्यांचे 19.75 लाख रुपये शैक्षणिक शुल्क सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने भरले!

बेळगाव : बेळगाव शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या एज्युकेशन फॉर नीडी या सेवाभावी शाखेच्या माध्यमातून शहरातील 166 गरीब गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींचे एकूण 19 लाख 75 हजार रुपये इतके शैक्षणिक शुल्क भरण्यात येणार असून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. आदित्य मिल्क आणि आदित्य आईस्क्रीम कंपनीच्या सहकार्याने हा उपक्रम …

Read More »

चोर्ला रस्ता तातडीने दुरुस्त करावा

बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे निवेदन बेळगाव (वार्ता) : गोव्याकडे जाणारा चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असून वाताहत झालेल्या या रस्त्यामुळे बेळगावच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याबरोबरच वाहनचालकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे …

Read More »

वेदांत सोसायटीला 9 लाख 60 हजारांचा निव्वळ नफा

बेळगाव : वडगाव-शहापूर रोड येथील वेदांत मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 11 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. आर्थिक वर्ष काळात संस्थेला 9 लाख 60 हजार 642 रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती, संस्थेचे चेअरमन संदीप खन्नुकर यांनी …

Read More »

बेळगाव सीमाप्रश्नाबाबत साहित्य संमेलनात दिखाऊ ठराव करणे बंद करा : अ‍ॅड. असीम सरोदे

बेळगाव : ’बेळगाव महाराष्ट्रात आणा’ असा दिखाऊ ठराव करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील वार्षिक दिखाऊ कार्यक्रम बंद करावा आणि बेळगावातील मराठी माणसांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करावा. भाषिक विविधतेतील सुंदरता न जपता मराठी माणसांवर बेळगावात कर्नाटक राज्याच्या कन्नड धार्जिण्या सरकारकडून, पोलिसांकडून व राजकारण्यांकडून होणार्‍या संघटित हिंसाचाराचा …

Read More »

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण खबरदारी : मुख्यमंत्री बोम्माई

तुमकूर : परदेशात ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कर्नाटकात खबरदारीचे उपाय योजण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. तुमकूर येथील सिद्धगंगा मठाला मुख्यमंत्री बोम्माई यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. …

Read More »

राज्यात लॉकडाऊन नाही! : आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण

बेंगळुरू : नव्या कोरोना विषाणू व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्याची शक्यता कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. सरकारने राज्यात लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आज सोमवारी स्पष्ट केले आहे. ‘ओमिक्रॉन’ या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे कर्नाटकात लॉकडाऊन जारी करण्यात येणार असल्याची शक्यता …

Read More »

आरटीपीसीआर रिपोर्ट शिवाय कर्नाटकात प्रवेश नाही : डीवायएसपी मनोजकुमार नाईक

सीमा तपासणी नाका बंदोबस्त कडक कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट असणे गरजेचे आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट नसणार्‍या प्रवाशांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येणार आहे, अशी माहिती चिक्कोडी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांनी दिली. कोगनोळी …

Read More »

धामणे(एस) परिसरात हत्तींचा धुमाकूळ

बेळगाव : एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असताना आता धामणे (एस) परिसरात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी तिलारी परिसरातील धामणे(एस) व चंदगड तालुक्यातील काही गावात हत्तींचा उपद्रव होत असतो. गेल्या चार दिवसांपासून धामणे (एस) परिसरात तीन हत्तींचा वावर असून भात …

Read More »

एस.के.ई. सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून एनसीसी दिवस साजरा

बेळगाव : ठळकवाडी हायस्कूलमध्ये नोव्हेंबर महिन्यातील चौथा रविवार एनसीसी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण, संविधान दिवस कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर, ज्येष्ठ शिक्षक विवेक पाटील, सुरेश भातकांडे, उपस्थित होते. मुख्याध्यापक आर. आर. कुडतूरकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आपले …

Read More »

असीम सरोदे यांचे उद्या बेळगावात व्याख्यान

बेळगाव : कायदे तज्ञ असीम सरोदे सोमवारी बेळगावला भेट देणार आहेत. सोमवार दि 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठीक 5.30 वाजता सरोदे यांचे बेळगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सभागृह गिरीश कॉम्प्लेक्स बापट गल्ली कार पार्किंग येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते ‘बेळगाव मध्ये होणारी मानवाधिकारांची पायमल्ली’ या विषयावर आपले …

Read More »