Tuesday , April 7 2026
Breaking News

LOCAL NEWS

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हायकमांडचे अभय

  राज्यातील राजकीय परिस्थितीची दिली माहिती बंगळूर : मुडा प्रकरणात राज्यपालांनी आपल्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज राज्याच्या राजकारणातील घडामोडींची माहिती हायकमांडला दिली. काँग्रेस हायकमांडने सिध्दरामय्या यांना संपूर्ण अभय दिले असून राजकीय व कायदेशीर मार्गाने लढा देण्यास सूचविले असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार …

Read More »

जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

  बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मोहन कारेकर होते तर व्यासपीठावर सेक्रेटरी शिवराज पाटील व खजिनदार अशोक हलगेकर उपस्थित होते. प्रारंभी मोहन कारेकर यांनी स्वागत केले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अशोक …

Read More »

कर्नाटकातील रस्ता दुरुस्तीसाठी महाराष्ट्रातील नागरिकांचा रास्तारोको

  बेळगाव : महाराष्ट्राच्या सीमेनजीक कर्नाटक हद्दीत अत्यंत खराब झालेल्या बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील संतप्त वाहनचालक आणि नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवरील शिनोळीजवळ भव्य रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला. बेळगाव – वेंगुर्ला या रस्त्याची महाराष्ट्र सीमेजवळ कर्नाटक हद्दीत खड्डे पडून वाताहत …

Read More »

प्रा. आनंद आपटेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रा. आनंद आपटेकर यांचा वाढदिवस सांबरा येथील माऊली लॉन येथे अनोख्या रीतीने नुकताच साजरा झाला. चव्हाट गल्लीतील देवदादा ज्योतीबा सासनकठी मंडळ, शिवजयंती मंडळ, बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळ, सावरकर ग्रुपसह विविध मंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अन् त्यांना दीर्घायुष्य लाभण्याची कामनाही केली. यावेळी त्यांच्या उत्तम …

Read More »

तुकाराम बँकेला 61 लाख 57 हजार 85 रुपयांचा निव्वळ नफा : चेअरमन प्रकाश मरगाळे

  सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर बेळगाव : श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शहापूर -बेळगाव या सहकारी बँकेने आर्थिक वर्षात 61 लाख 57 हजार 85 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून संस्थेने यंदा सभासदांसाठी 13% लाभांश जाहीर केला आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश आप्पाजी मरगाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली …

Read More »

सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी स्वागत समितीची बैठक

  बेळगाव : सहकार महर्षी कैलासवासी अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दीच्या स्वागत समिती सभासदांची बैठक आज सायंकाळी पाच वाजता मराठा मंदिर खानापूर रोड येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वागत समितीचे अध्यक्ष श्री. बाळाराम पाटील हे होते. प्रारंभी जिजामाता बँकेचे व्यवस्थापक श्री. नितीन आनंदाचे यांनी सर्व उपस्थित यांचे स्वागत करून मागील बैठकीचा …

Read More »

विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात मोबाईल केबल, फांद्यांचे विघ्न नकोत!

  लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगावातील काही गणेशोत्सव मंडळांनी येत्या 1 सप्टेंबर 2024 पासून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या मंडपांमध्ये नेण्याचे नियोजन करत आहेत. यापुढेही सुट्टीच्या दिवशी शहर व उपनगरात अनेक मंडळांचे आगमन सोहळे होणार आहेत. शहरातील व प्रमुखतेने श्री …

Read More »

महिलेला ब्लॅकमेल करून लैंगिक छळ केल्याप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

  बेळगाव : बेळगावमधील एका महिलेला ब्लॅकमेल करून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात भाजप नेते पृथ्वी सिंह आणि त्यांचा मुलगा जसवीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत विष प्राशन …

Read More »

बेळगाव येथील श्री रुद्र केसरी मठात श्री सिद्धारू महाराज पुण्यतिथी साजरी

  बेळगाव : बेळगाव लक्ष्मीटेक जवळील सैनिक नगर येथील श्री रुद्र केसरी मठात आज मंगळवार रोजी श्री सिद्धारूढ महाराज पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. आज पहाटेपासूनच श्री सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त रुद्र केशरी मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य हरि गुरु महाराजांच्या सानिध्यात पहाटे श्रीमूर्तीला …

Read More »

सदलगा येथे सिलेंडर स्फोट; एकाचा जागीच मृत्यू

  चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा गावात घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे. बिड, महाराष्ट्रातील सूर्यकांत शेळके (५५) यांचा मृत्यू झाला. ज्ञानोदय हे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिलेंडरच्या स्फोटाच्या तीव्रतेमुळे …

Read More »