Sunday , July 26 2026
Breaking News

आमदार लक्ष्मण सवदी यांच्या निकटवर्तीयाची निर्घृण हत्या

Spread the love

 

बेळगाव : अथणी येथील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले अण्णाप्पा बसण्णा निंबाळ (वय ५८) यांची काल बुधवारी रात्री अज्ञातांनी निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अण्णाप्पा बसण्णा निंबाळ हे आमदार लक्ष्मण सवदी यांचे निकटवर्तीय होते.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अण्णाप्पा निंबाळ हे खिळेगाव देवस्थान परिसरामध्ये गोदामाचे बांधकाम करीत होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यात ते गंभीर जखमी होऊन कोसळले. स्थानिकांनी त्यांना तातडीने अथणी शासकीय रुग्णालयात हलविले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी डीएसपी विश्वनाथ जलदे, पीएसआय शिवानंद कारजोळ व गुन्हा विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पंचनामा केला. हल्लेखोर मोटारसायकलवरून सपासप वार करून पसार झाला आहे. अथणी पोलिसांचे पथक तपास करीत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *