बेळगाव : बायपासबाबत उच्च न्यायालयात गुरुवार (ता. ४) होणार आहे. शेतकऱ्यांचे लक्ष सुनावणीकडे लागून आहे. २००९ पासून हलगा -मच्छे बायपास करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. काम बंद ठेवावे यासाठी प्रयत्न असून बायपासच्या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय काम सुरू करु नये, अशी स्पष्ट सूचना केली होती. तसेच कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने पोलिस बंदोबस्तात सपाटीकरण करण्याचे काम पूर्ण केल्यानंतरही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली होती. मात्र बायपासच्या कामाला दिलेली स्थगिती आदेश उठविल्यानंतर काही दिवसांपासून वेगाने काम हाती घेतले आहे. काही दिवसात अधिक प्रमाणात यंत्रणा लावून विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पोलिस बंदोबस्तात बायपासचे काम हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवत ४ एप्रिलला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती दिली होती. शेतकऱ्यांतर्फे ऍड. रविकुमार गोकाककर काम पाहत आहेत.