Wednesday , July 9 2025
Breaking News

लोकसभा निवडणूक लढवणार नाही : खासदार सुमलता अंबरीश

Spread the love

 

भाजपात प्रवेश करणार

बंगळूर : साखर भूमी असलेल्या मंड्याशिवाय माझे कोणतेही राजकीय जीवन नाही. आज मी तुमच्यासमोर शपथ घेते की मंड्याचे आणि या मंड्यातील जनतेचे ऋण मी कधीही विसरणार नाही, असा पुनरुच्चार खासदार सुमलता अंबरिश यांनी केला. यावेळी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करून सहा एप्रील रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
खासदार सुमलता अंबरीश २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. आता भाजप- धजद युतीचे उमेदवार म्हणून एच. डी. कुमारस्वामी यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने त्यांना दुसऱ्या मतदारसंघाची ऑफर दिली होती. त्यामुळे त्या आता काय निर्णय घेणार याविषयी राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती.
मंड्यातील समर्थकांच्या खुल्या सभेत बोलताना त्या भावूकपणे म्हणाल्या की, मंड्या जिल्ह्यातील जनतेने मला आईचे स्थान दिले असून ही आई मुलांपासून कधीही हिरावून घेता येणार नाही. अनिच्छेने मी यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार नाही. मी भाजप-धजद युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देईन. काँग्रेस पक्षात सहभागी होणार नाही. मात्र मी राजकारण सोडलेले नाही. मोदींच्या देशासाठीच्या स्वप्नाच्या समर्थनार्थ आज आपण उभे राहिले पाहिजे. त्यांनी आपली खासदारकी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
जिथे आदर नाही तिथे मी जाणार नाही, काँग्रेसचे नेते माझ्याबद्दल काय बोलले ते तुम्ही सर्वांनी पाहिले असेल, जिथे आदर नाही तिथे मी का जाऊ, असा पलटवार सुमलता यांनी केला, गेल्या तीन दिवसांपासून कानावर पडलेल्या सर्व अफवांचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
भाजपमध्ये सामील होणार
मला वाटते की पंतप्रधान मोदी या देशाच्या भविष्याचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. मोदी हे संपूर्ण जगाचे कौतुक करणारे नेते आहेत. त्यांच्यात स्वार्थी राजकारण नाही, भाजप सरकारने मला अपक्ष खासदार म्हणून मंड्या जिल्ह्यात काम करण्यासाठी अनुदान देऊन मदत केली आहे. त्यामुळे आगामी काळात चांगले काम करण्यासाठी ६ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मी अपघाताने राजकारणात प्रवेश केला. पाच वर्षांपूर्वी तुम्ही मला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. गेल्या पाच वर्षांपासून माझ्यासोबत असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन. मी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी उभी आहे. माझ्या मनात फक्त जिल्ह्याचा विकास करायचा होता. मी केआरएस धरणाच्या अवैध उत्खनन आणि संवर्धनाविरोधात लढा दिला. मायशुगर कारखान्यासाठी दोन वर्षे लढा दिल्याचे त्यांनी सांगितले.
२०१९ मध्ये, वेगळ्या प्रकारचे आव्हान होते. आता बदललेल्या परिस्थितीत माझ्यासमोर आणखी एक आव्हान आहे. तिकीट राखण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत लढा दिला. त्यांनी मला बंगळूर नॉर्थ, म्हैसूर, चिक्कबळ्ळापूर येथे थांबण्यास सांगितले. मला वेगवेगळ्या मतदारसंघांची ऑफर देण्यात आली. मांड्या सोडून मी कुठेही जाणार नाही, असा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
खासदारपद हे कायमस्वरूपी नसते. आज मी, उद्या दुसरा खासदार म्हणून येणार. पण मी शेवटपर्यंत मांड्याची सून राहीन. बदललेली परिस्थिती समजून घ्यायला हवी. यश मिळवण्याचा हेतू असेल तर अपक्ष म्हणून स्पर्धा करता येते. पण त्याचा फायदा कोणाला? माझा कोणताही स्वार्थ नाही, फायद्याचा विचार केला असता तर मी दुसरे क्षेत्र निवडू शकले असते. मंड्यासाठी आलेल्या संधी मी सोडल्या. मंड्यामध्येच राजकारण करायचे ठरवले आहे. अंबरीशने असंख्य चाहते जोडले, आता मंड्या सोडून गेले तर मंड्याची सून म्हणून सांगायचा नैतिक हक्क मी गमावून बसेन, असे त्या म्हणाल्या.

About Belgaum Varta

Check Also

दुसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी बेळगाव, गुलबर्ग्याच्या आमदारांशी चर्चा; सुरजेवाला यांनी जाणून घेतल्या तक्रारी

Spread the love  जाहीर वक्तव्य न करण्याची ताकीद बंगळूर : राज्य सरकारवर नाराज असलेल्या कॉंग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *