बेळगाव : बेळगावातील शिवा पेट्रोल पंप येथे एसएसटी टीमने व्यासराव व्यंकटराव शानबाग, वय 65 वर्ष, मुलाचे उडुपी सध्या राहणार सातारा यांच्याकडून 3,46,240/- रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. व्यासराव व्यंकटराव शानबाग हे आपल्या इर्टिगा कार क्रमांक एमएच 11 बीएच 3137 मध्ये उडुपीहून साताऱ्याकडे जात होते. त्यावेळी शिवा पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या कारची तपासणी केली असता हे विना कागदपत्रे नेण्यात येणारी रक्कम आढळून आली. एसएसटी पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.