निपाणी (वार्ता) : येथील आऊबाई काशिनाथ मेस्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त जेवणावळीला फाटा देऊन सेवानिवृत्त मंडल अधिकारी राजकुमार मेस्त्री आणि ॲड. दिलीप मेस्त्री परिवारातर्फे अर्जुनी येथे वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविला.
यावेळी २५ हजार रुपयांची बारा फूट रोपे जेसीबीने खड्डे काढुन लावण्यात आली. याशिवाय उन्हाळा संपेपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करून रोपे जगविण्याचा निश्चय केला आहे. डॉ. प्रशांत अथणी, ॲड. अविनाश कट्टी, सुनील देसाई, दिलीप मेस्त्री नामदेव चौगुले, राजकुमार मेस्त्री यांनी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या प्रियजनांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा. डॉ. अशोक डोनर, प्रा. शिवाजी मोरे, प्रा. एन. डी. जत्राटकर, बापूसाहेब यादव, सुनील देसाई, वर्षा सुतार, रंजना कांबळे, राजन देसाई, सुरेश देसाई, बाजीराव चौगुले, शिवानंद चौगुले, फिरोज चाऊस, विजय गावडे, महादेव पेडणेकर, अनिल उन्हाळे, दयानंद पेडणेकर, प्रवीण सौंदलगे, हिटलर माळगे, मनीषा देसाई, मंजुळा भोसले, गणेश माळी, प्रकाश शिंगे, आदित्य पाटील उपस्थित होते. बाजीराव चौगुले यांनी मानले.