बिजगर्णी : येथील महालक्ष्मी यात्रेची तयारी जय्यत सुरू झाली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे रथ. या रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बिजगर्णी व कावळेवाडीतील सुतार कुटुंबियांनी रथ बांधणीचे काम स्वीकारले आहे.
16 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या लक्ष्मी यात्रेची तयारी यात्रोत्सव कमिटीचे पदाधिकारी यांनी पूर्व नियोजित विधिवत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, सचिव चांगदेव जाधव, खजिनदार ऍड. नामदेव ना. मोरे व सर्व पदाधिकारी सर्व कामावर लक्ष केंद्रित करून, यात्रेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना, भक्त जनांची गैरसोय होऊ नये, पाणी, आरोग्य व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, रात्री होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यांची शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणं सुरू आहे.
तीस वर्षांनंतर होणारी ही यात्रा बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप तिन्ही गावात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
यात्रेची लगबग सुरू आहे. आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
रथाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यावेळी यात्रोत्सव कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.