हरिद्वार : भारती श्रमजीवी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव आणि बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा आज शनिवारी हरिद्वार येथे श्रीगंगा महासभा वतीने विशेष सन्मानित करण्यात आले. श्रीकांत काकतीकर सह पत्नी हरिद्वार येथे आले असता भारती श्रमजीवी पत्रकार संघ उत्तराखंड पत्रकार संघ, हरिद्वार प्रेस क्लब,तसेच गंगासभेच्या वतीने आज सायंकाळी गंगा आरती …
Read More »LOCAL NEWS
जायंट्स 6 फेडरेशनवर लाड, पाटील, हिरेमठ यांची निवड
बेळगाव : राज्यातंर्गत कार्यरत असलेल्या जायंट्स फेडरेशन 6 वर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे माजी अध्यक्ष अनंत लाड, शिवराज पाटील व शिवकुमार हिरेमठ यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी युनिट डायरेक्टरपद भुषविलेले अनंत लाड यांना पुन्हा युनिट एक च्या डायरेक्टरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी तीन वेळा फेडरेशन …
Read More »‘मतदारांना उत्तर द्या’ अभियानांतर्गत ग्रामीण भाजप मंडळचे मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटक सरकारने जनतेला हमी योजनेचे आश्वासन दिले आणि सत्तेत आल्यानंतर ते राज्यात विकासकामे करत नाहीत, अर्थसंकल्पातील पैशाची चर्चा करून जनतेला आश्वासने द्यावीत पण काँग्रेस पक्षाने मोफत योजनेचे आश्वासन दिले आणि आज राज्य सरकार दिवाळखोर झाले आहे, असा आरोप भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला. भारतीय …
Read More »बेळगावात हरे राम.. हरे कृष्णाचा जागर!
उद्याही विविध कार्यक्रम बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या २६व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्याशी भक्ती रसामृत स्वामी महाराज आणि चैतन्य सुंदर महाराज, मॉरिशस व वृंदावनदास महाराज यांच्या हस्ते रथाची …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी तर्फे 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिन मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी प्रबोधिनीचा हा रौप्य महोत्सवी मराठी भाषा दिन आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवर वक्त्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर सीमाभागातील मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या …
Read More »येळ्ळूरमध्ये उद्या 19 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : चार सत्रात आयोजन, पुरस्काराचेही वितरण
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलन नगरीत, श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या पटांगणात 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन …
Read More »ॲड. एस. एस. किवडसण्णावर सहाव्यांदा बार असोसिएशन अध्यक्षपदी
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी विजय मिळवला आहे. वकील संघटनेच्या कार्यालयात शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत चाललेल्या मतमोजणीत ते सहाव्यांदा अध्यक्ष पदी विजयी झाले. बेळगाव बार असोसिएशनची 2024 ते 26 या काळासाठी शुक्रवारी मोठ्या चुरशीने पार पडली. बेळगाव बार असोसिशनच्या एकूण 11 जागांसाठी 37 जण …
Read More »४० टक्के कमिशनचे पुरावे असल्यास आयोगाकडे सादर करा
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; ईश्वरप्पांच्या वादग्रस्त वक्तव्यावर इशारा बंगळूर : राज्यातील ४० टक्के कमिशनच्या आरोपावरून पुन्हा गदारोळ होत आहे. कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष केम्पण्णा यांनी मागील भाजप सरकारवर ४० टक्के कमिशनचा आरोप केला होता. आता त्यांनी काँग्रेस सरकारवरही असेच आरोप केले आहेत. मात्र मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी अशा आरोपाची कागदपत्रे किंवा पुरावे असल्यास …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील वसाहतीना पाणीपुरवठा प्रकल्पाना मंजूरी
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्येही आरक्षण बंगळूर : जलजीवन अभियानांतर्गत बेळगावमधील निवडक वस्त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ३७७ कोटी रुपये खर्चाचे दोन प्रकल्प राबविण्यास गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंत्री एच.के. पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, बेळगावच्या हुक्केरी तालुक्यातील दड्डी व इतर ८१ गावे …
Read More »अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन; ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत संमेलनाध्यक्षपद भूषविणार
स्वागताध्यक्ष : शिवसंत संजय मोरे बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित ‘5 वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2024’ रविवार दि.18 फेब्रुवरी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण होते. यावेळी साहित्यिक निवड करण्याकरिता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta