Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

वॉकर्स ग्रुपचे बुधवारी संमेलन

  बेळगाव : चन्नम्मानगर येथील वॉकर्स ग्रुपचे दुसरे संमेलन बुधवारी (ता. 24) सायंकाळी 5 वाजता सुभाषचंद्रनगर नागरिक संघटना हॉल (उत्सव हॉटेलमागे) येथे होणार आहे. कोरोना महामारीमुळे सदर संमेलन तीन वर्षांनी होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद हलगेकर उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव असतील. …

Read More »

सत्यन्नावर कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी!

  बेळगाव : सत्यन्नावर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलीचा वाढदिवस माहेश्वरी अंध शाळेत साजरा केला. सत्यन्नावर कुटुंबीयांनी आपली मुलगी सुचित्रा सत्यन्नावर हिच्या वाढदिवसप्रित्यर्थ माहेश्वरी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना केक, चॉकलेट व अल्पोपहारचे वाटप केले. हल्ली वाढदिवसाच्या निमित्ताने हजारी रुपयांचा चुराडा करणार्‍या तरुणाईला सत्यन्नावर कुटुंबीयांनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे, …

Read More »

शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त संपूर्ण मंदिर आकर्षकरित्या विद्युत रोषणाई, विविध फुलां-पानांपासून सजविण्यात आले होते. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून पंचामृत अभिषेक पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यात आले. त्यानंतर एकादश रुद्राभिषेक करण्यात आला. श्रावण सोमवार निमित्त मंदिरामध्ये त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी …

Read More »

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र

  बेळगाव : बेळगावातील हिंडलगा रोडवर (वनिता विद्यालयाजवळ) आज सकाळी बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र केली. आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईची माहिती घेतली. पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी आदी उपस्थित होते.

Read More »

गोल्फ कोर्स परिसरातील “त्या” शाळांना आज सुट्टी

  बेळगाव : आज सकाळी साधारण 6.30 च्या दरम्यान गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील 22 शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली. शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले की, बिबट्या दिसल्याने बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील २२ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी (२२ ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

शिरगुप्पीजवळील मुळवाड येथे बिबट्याचे दर्शन

मुळवाड : बेळगाव जिल्ह्यात आणखी एक बिबट्या आढळून आला असून संपूर्ण जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. कागवाड तालुक्यातील शिरगुप्पीजवळील मुळवाड येथील शेतात रविवारी सायंकाळी बिबट्या दिसला. प्रशांत पाटील नावाचा शेतकरी शेतात गेल्यावर बिबट्याला पाहून घाबरून पळून आला. शेतकऱ्याने येऊन सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी जाऊन खात्री केली असता तिथे पायाचे ठसे आढळून आले. …

Read More »

मडिकेरी २६ ला ठरणार कॉंग्रेस-भाजपचे रणांगण

अंडीफेक वाद वाढला; कॉंग्रेसची ‘मडिकेरी चलो’ची हाक, भाजपची जनजागृती बैठक बंगळूर : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकल्याच्या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अंडी फेकल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मडिकेरी चलो’ची हाक दिली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही पलटवार केला असून मडिकेरी जिल्हा भाजप युनिटने …

Read More »

सार्वजनिक वाचनालय आयोजित भजन स्पर्धा उद्यापासून

बेळगाव : बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक 22 ऑगस्टपासून आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेला उद्या प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. एस. बी. ओऊळकर यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

बेळगावातील सार्वजनिक गणेश मंडपात वीर सावरकरांचे भावचित्र लावावेत : आमदारांची सूचना

  बेळगाव : काँग्रेसने सावरकरांची प्रतिमा लावण्यास विरोध दर्शविल्यानंतर भाजप आता गणेशोत्सवात सावरकरांचे भावचित्र लावण्यास पुढे सरसावला आहे. बेळगावातही सावरकरांचे चित्र लावण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांमध्ये सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय यांनी गणेशोत्सवादरम्यान …

Read More »

‘ना नफा ना तोटा’ अथर्व फाउंडेशनची दुसरी लॅब बेळगावात सुरु

  बेळगाव : अथर्व फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सोमवार पेठ टिळकवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लॅबोरेटरीला मिळालेला प्रतिसाद आणि शहरी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अथर्वच्या वतीने कडोलकर गल्ली बेळगाव येथे रविवारी आणखी एक रक्त-लघवी कलेक्शन केन्द्राचा प्रारंभ करण्यात आला. उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके व …

Read More »