Sunday , February 9 2025
Breaking News

भारताचा श्रीलंकेवर दोन धावांनी विजय, मालिकेत १-० ने आघाडी

Spread the love

 

मुंबई : भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आणि त्यात भारतीय संघाने २ धावांनी विजय मिळवला. अक्षर पटेलने टाकलेल्या शेवटच्या जादुई षटकाने भारताला विजय मिळवून दिला. शिवम मावीने धारदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना पळताभुई थोडी केली. हार्दिक पांड्याने संघाच्या कर्णधाराची जबाबदारी उत्तम पार पाडली. हार्दिकच्या नेतृत्वातील युवा ब्रिगेडने श्रीलंकेविरुद्धच्या या टी२० मालिकेत गुणवत्ता सिद्ध करत वानखेडे मैदानावर २०० पेक्षा कमी धावसंख्येचा पहिल्यांदा बचाव करताना एक नवीन इतिहास रचला. दिपक हुड्डाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारतीय संघ पहिल्या टी२० सामन्यात नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या वरच्या फळीने झटपट विकेट्स गमावल्या होत्या. भारताचा अर्धा संघ तंबूत गेला होता. मात्र, भारताच्या तळातील फलंदाजांनी अशी काही खेळी केली की, पाहुण्या संघाला सहावी विकेट मिळालीच नाही. यासह तळातील फलंदाजांच्या जोडीने शानदार भागीदारी रचत खास विक्रमाची नोंद केली.
ती जोडी इतर कुणी नसून दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांची जोडी आहे. भारतीय संघ एकेवेळी १४.१ षटकात ५ विकेट्स गमावत ९४ धावांवर खेळत होता. त्यावेळी मैदानावर हुड्डा आणि पटेल खेळत होते. या दोघांनीही विकेट न गमावता श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी या जोडीने नाबाद ६८ धावांची भागीदारी रचली. यावेळी हुड्डाने ३५, तर पटेलने ३१ धावांचे योगदान दिले.
धावांचा पाठलाग करताना यजमानांची खराब सुरुवात झाली. श्रीलंका संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार दसून शनाका याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूत ४५ धावा केल्या. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस याने २८, तर वनिंदू हसरंगा याने २१ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. भारताकडून शिवम मावी सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद विजयात मोलाची साथ दिली.
खराब सुरुवात असूनही अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांच्या शानदार भागीदारीमुळे टीम इंडियाने पाच गडी गमावून १६२ धावा केल्या. दीपक हुडाने सर्वाधिक ४१ धावा केल्या. इशान किशनने ३७, अक्षरने ३१आणि हार्दिकने २९ धावा केल्या. कासून रजिथा वगळता श्रीलंकेच्या सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दिलशान मदुशंका, महेश तीक्षणा, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा आणि धनंजया डी सिल्वा यांनी मिळून पॉवर प्ले मध्ये भारताच्या धावसंख्येला ब्रेक लावला. टीम इंडियाच्या बाकी फलंदाजांना फारशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सूर्यकुमार यादव, शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांना दोन आकडी धावसंख्या देखील गाठता आली नाही.

About Belgaum Varta

Check Also

‘बस्स आता खूप…’; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला

Spread the love  सिडनी : भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना गमावला. मेलबर्न सामन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *