Thursday , September 19 2024
Breaking News

‘मुडा’ घोटाळा: मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पत्नी पार्वती यांच्यासह १० जणांविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

 

बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकारण (मुडा) घोटाळ्यासंदर्भात बनावट कागदपत्रे सादर करून भूखंड मिळवल्याच्या आरोपाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती आणि एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुडा घोटाळ्यात दिवसेंदिवस नवनवीन नावे ऐकायला मिळत आहेत, आता म्हैसूर विजयनगर पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्र तयार करून मुडाची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती आणि एकूण १० जणांविरुद्ध बनावट कागदपत्रे सादर करून जागा मिळवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पत्नी पार्वती, आई मल्लिकार्जुनस्वामी देवराज आणि कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच प्रकरणात जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपनिबंधक आणि मुडा अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
स्नेहमाई कृष्णा नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल करून पोलिसांसह राज्यपाल, राज्याचे मुख्य सचिव, महसूल विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहिले आहे.
फिर्यादीत तक्रारदाराने अनेक प्रश्न उपस्थित केले असून पर्वती प्रकरणात भूसंपादन सोडल्या गेलेल्या स्टेट डीडबाबत साशंकता आहे. मूळ जमीन मालकाचे पुत्र मल्लिकार्जुनस्वामी देवराज यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९९८ मध्ये भूसंपादन सोडण्यात आले हे खरे असेल तर आरटीसीमध्ये २०१०पर्यंतच्या भूसंपादनाचा उल्लेख का आहे, असा सवाल त्यांनी केला.
१९९८ मध्ये भूसंपादन सोडण्यात आले हे खरे असेल तर आरटीसीमध्ये २०१० पर्यंत भूसंपादन का नमूद करण्यात आले आहे. नंतर ही जमीन मल्लिकार्जुनस्वामी देवराजू यांच्या मालकीची व त्यांच्या ताब्यात होती, तर प्राधिकरणाची विकासकामे का थांबवली नाहीत? असा त्यांनी सवाल केला.
इतकेच नव्हे तर या घोटाळ्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपनिबंधक आणि मुडा अधिकारी यांचाही सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

Spread the love  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *