बंगळूर : राजकारण्यांच्या हनीट्रॅपच्या घोटाळ्याने खळबळ उडाली असतानाच येथील महालक्ष्मी लेआउटमध्ये हनीट्रॅपचे एक आगळे प्रकरण समोर आले आहे. एका खासगी प्रीस्कूल शिक्षिकेने प्रीस्कूलमध्ये येणाऱ्या मुलांच्या पालकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून एका वेळी ५० हजार रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. एका व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षिकेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बंगळुरच्या महालक्ष्मी परिसरात प्री-स्कूल चालवणाऱ्या एका शिक्षिकेने मुलांच्या पालकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून ५० हजार रुपये खंडणी वसूल कल्याचा प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला. त्यामुळे एक व्यवसायिक चांगलाच आर्थिक अडचणीत आला आहे.
चुंबन देऊन ५० हजार रुपये उकळणाऱ्या खतरनाक प्रीस्कूल शिक्षिकेसह तिघांना सीसीबी पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
३४ वर्षीय व्यापारी राजेश यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून, खासगी शाळेतील २५ वर्षाची शिक्षिका, तिचा प्रियकर सागर मोरे (वय २८) आणि गुंड गणेश काळे (वय ३८) यांना खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी विजापुर येथील आहेत. अटक करण्यात आलेल्या गुंड गणेश काळेविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात धमकावणे, खंडणी आणि हत्येचा प्रयत्न असे ९ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२०२३ मध्ये, आरोपी शिक्षिकेची ओळख उद्योजक व पालक राकेश यांच्याशी झाली. त्यांच्याकडून तिने शाळेचे व्यवस्थापन आणि आपल्या वडिलांच्या उपचारासाठी चार लाख रुपये कर्ज स्वरूपात घेतले. पैसे परत करण्यास तिने नकार दिला आणि शाळा व्यवस्थापनात त्यांना भागिदार करून घेतले. तेंव्हा पासून उद्योजकाला हनिट्रॅपमध्ये अडकवून लाखो रुपयाची वसूली केली. ती सातत्याने त्याला ब्लॅकमेल करत राहीली.
या कामात तिला सहकार्य करणारे आरोपी सागर आणि गणेश यांनी त्याला धमकी दिली. शिक्षिका आपली पत्नी असल्याचे सांगून तिच्याशी संबबंध ठेवल्याचा आरोप सागरने केला व त्यांच्याकडून एक कोटी खंडणीची मागणी केली. शेवटी राकेशने भिऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, श्रीदेवी, अरुण आणि सागर यांना अटक करण्यात आली आहे, न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील चौकशीसाठी सीसीबी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.