मंत्रिमंडळाचा निर्णय; गोकाक येथे माता-बाल रुग्णालय, नवीन चंदन धोरणास मंजूरी
बंगळूर : विधिमंडळाचे अधिवेशन येत्या १९ ते ३० डिसेंबर दरम्यान बेळगावातील सुवर्ण विधानसौधमध्ये घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गोकाक येथे २०० खाटांचे माता-बाल रुग्णालय मंजूर करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
तसेच, नवीन चंदन धोरण-२०२२ ला मंजुरी, नवीन वन्यजीव अभयारण्य प्रस्ताव, तुमकूर जिल्हा रुग्णालय अपग्रेड करण्यासाठी ५६ कोटी रुपये. सात रुग्णालयांसाठी १५८ कोटी अनुदान देण्यास सहमती, एनएचएम फंडातील रुग्णालयांचे अपग्रेडेशन आदी विषयांना मंत्रिमंडळात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नवीन चंदन धोरण- २०२२ मंत्रिमंडळाने मंजूर केले. शेतकऱ्यांना खासगी जमिनीवर चंदन उगवण्याची परवानगी आहे. आता खुल्या बाजारात विकता येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असल्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे धोरण लागू करण्यात आले आहे. संरक्षण उद्देशांसाठी तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी, चंदन लाकूड कापण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या आम्ही ऑस्ट्रेलियातून चंदन आयात करत आहोत. यापूर्वी चंदन विक्रीवर बंदी होती.
* नवीन वन्यजीव अभयारण्य प्रस्ताव मंजूर : राज्यात नवीन उत्तरेगुड्डा वन्यजीव अभयारण्ये, बांकापुर वन्यजीव अभयारण्ये आणि आरसेकेरे अस्वल अभयारण्ये सोबत हिरेसुलेकेरे अस्वल अभयारण्य, चिक्कासंगमा पक्षी अभयारण्य, मुंडिगे तलाव आणि बर्ड संचुरी राखीव निधी घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
* तुमकूर जिल्हा रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी ५६ कोटी रुपये मंजूरी.
*उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी निदान किट खरेदीसाठी १५४.६३ कोटी अनुदानास मंजूरी.
* एनएचएम फंडात रुग्णालयांच्या अपग्रेडेशनसाठी संमती. सात रुग्णालयांसाठी १५८ कोटी अनुदानास प्रशासकीय मान्यता.
माता व बाल रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी तारिकेरे येथे १०० खाटांचे माता-बाल रुग्णालय, लिंगसुगुर येथे ५० खाटांचे माता-बाल रुग्णालय, हरिहर येथे ५० खाटांचे माता-बाल रुग्णालय आणि गोकाक येथे २०० खाटांचे माता-बाल रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे.
* केसी जनरल हॉस्पिटलमध्ये ट्रॉमाकेअर सेंटरच्या स्थापनेसाठी ३५ कोटी रुपये मंजूर. तुमकूर नर्सिंग कॉलेजच्या बांधकामासाठी २० कोटी अनुदानास प्रशासकीय मान्यता.
* धारवाड-हल्याळजवळ लेव्हल क्रॉसिंग रोडखाली पूल बांधण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपये मंजूर
* ईएसआय रुग्णालयातील उपकरणे खरेदीसाठी ४४ कोटी रुपये. प्रशासकीय मान्यता. नंजनगुडू श्रीकंठेश्वर मंदिर व्हीआयपी रूमच्या बांधकामासाठी १६.५२ कोटीच्या अनुदानास मंजूरी.
*बेळ्ळारी तालुक्यातील सहा निवासी भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ११ कोटी रुपये.
*अंजनापुरात परिवहन भवन बांधण्यासाठी २५ कोटी अनुदान
*क आणि ड गटातील कर्मचाऱ्यांच्या पती-पत्नीच्या बाबतीत आंतरजिल्हा बदलीला परवानगी देण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती देण्यात आली.
सुरळीत अधिवेशनाचा विश्वास
दरम्यान, धारवाड शहरात पत्रकारांशी बोलताना विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी बेळगावातील अधिवेशन सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, यावेळी कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता अधिवेशन चांगल्या पद्धतीने पार पडेल. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना या संदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घ्यायचा आहे. त्याची आम्ही प्रतिक्षा करीत आहोत.
अधिवेशनासाठी १० दिवस पुरेसे नाहीत. चर्चेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही या सूचनेला उत्तर देताना, मंत्रिमंडळात जो निर्णय होईल त्याचे पालन करण्यात येईल, असे त्यांनी उत्तर दिले.
Belgaum Varta Belgaum Varta